Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र पंकजा मुंडेचं दबावतंत्र नाही, वेगळा निर्णय घेणार नाहीत; भाजप नेत्यांना विश्वास

पंकजा मुंडेचं दबावतंत्र नाही, वेगळा निर्णय घेणार नाहीत; भाजप नेत्यांना विश्वास

Related Story

- Advertisement -

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने मुंडे समर्थकांनी त्यांच्या पदांचे राजीनामे दिले आहेत. या नाराज समर्थकांची भेट घेण्यासाठी पंकजा मुंडे वरळी येथील कार्यालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, आजच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर भाजपच्या आमदारांनी प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास भाजपच्या आमदारांनी व्यक्त केला आहे.

पंकजा मुंडेचं दबावतंत्र नाही – आशिष शेलार

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराज समर्थकांची वरळी निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठं विधान केलं आहे. कोणतंही दबाव तंत्र नाही. पंकजा मुंडे कधी असं करत नाहीत, करणार नाहीत. कधी कधी कार्यकर्त्यांच्या भावनाचा आक्रोश होतो. तो काही पक्ष द्रोह असल्याचं मानण्याचं कारण नाही, असं शेलार यांनी स्पष्ट केलं. तसेच पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराजीच्या बातम्यांवर उत्तर दिलं आहे. त्यामुळे अधिक बोलण्याची गरज नाही, असंही शेलार म्हणाले.

वेगळा निर्णय घेणार नाहीत – राम शिंदे

- Advertisement -

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवला. काँग्रेसची सत्ता असतानाही त्यांनी राज्यात मोठं काम केलं. त्यामुळे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यातही प्रीतम मुंडे दुसऱ्यांदा निवडून आल्या तर भागवत कराड एका वर्षापूर्वीच खासदार झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आपला निर्णय जाहीर करतील. पण पंकजा मुंडे या वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही, असा विश्वास भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला.

 

- Advertisement -

 

- Advertisement -