घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजी महाराजांची उंची गाठता येत नसेल तर...; नितेश राणेंच पवारांवर टीकास्त्र

छत्रपती संभाजी महाराजांची उंची गाठता येत नसेल तर…; नितेश राणेंच पवारांवर टीकास्त्र

Subscribe

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं विधान केलं. मात्र अजित पवारांच्या या विधानावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर अजित पवारांनी माफीची मागणी केली आहे. मात्र अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गाड्यांवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे स्टिकर लावण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान बोलताना नितेश राणेंनी छत्रपती संभाजी महाराजांची उंची गाठता येत नसेल तर, टीका कशाला करायची, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या विरोधी पक्ष नेते अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आहेतच आणि ही पदवी त्यांच्यासोबत वर्षानुवर्षे चालत आहे. आता कोणतरी उठतो आणि सांगतो की, बाबा धर्मवीर ही पदवी लावू नका, ते धर्मवीर नव्हते.

- Advertisement -

कोणीतरी आपलं सिरीयल चालावं म्हणून कोणाला तरी कागदावर काहीतरी लिहून देतो आणि ते मग पत्रकार परिषदेमध्ये वाचून दाखवतात, या सगळ्या गोष्टींमुळे वर्षांनोवर्षे पिढ्यानपिढी ज्या गोष्टी चालल्या आहेत, त्या काय गोष्टी थांबणार नाहीयेत ना आमच्यासाठी आणि उभ्या महाराष्ट्रासाठी देशासाठी. येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच आहेत आणि ते धर्मवीरच राहणार आहेत, असं म्हणत नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांवर टीकास्त्र डागले आहे.

नितेश राणे पुढे म्हणाले की, हे एक षडयंत्र आहे, संभाजीराजे व हिंदुत्व या विरोधात हे एक षडयंत्र आहे ते समजून घेणे आवश्यक आहे. यांना विशिष्ट धर्माच्या लोकांना खुश ठेवायच आहे त्यासाठी सर्व एका रांगेत उभे राहून कोण हिंदुद्वेष सर्वात जास्त करत याची स्पर्धा चालू आहे.

- Advertisement -

आज सिंधुदुर्गमध्ये कोकणामध्ये आमचे कार्यकर्ते शिवप्रेमी यानी आपआपल्या गाड्यांवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्टिकर लावण्याची सुरुवात केली आहे आणि आता पूर्ण महाराष्ट्रमध्ये ही मोहीम आम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राबवणार आहोत. असे आमदार नितेश राणे म्हणाले आहेत.


अहमदाबादमध्ये इमारतीला भीषण आग, एका मुलीचा मृत्यू

छत्रपती संभाजी महाराजांची उंची गाठता येत नसेल तर…; नितेश राणेंच पवारांवर टीकास्त्र
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -