घरताज्या घडामोडीनितेश राणेंनी उल्हासनगर पोलिसांना घेतले फैलावर; 'या' प्रकरणी देवेंद्र फडणवीसांकडे करणार तक्रार

नितेश राणेंनी उल्हासनगर पोलिसांना घेतले फैलावर; ‘या’ प्रकरणी देवेंद्र फडणवीसांकडे करणार तक्रार

Subscribe

उल्हासनगरमध्ये एका धर्माच्या 26 वर्षीय तरुणाने दुसऱ्या धर्मातील एका 24 वर्षांच्या तरुणीला पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी उल्हासनगरातील भाजप आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, तसंच कारवाई करण्याची मागणी केली.

उल्हासनगरमध्ये एका धर्माच्या 26 वर्षीय तरुणाने दुसऱ्या धर्मातील एका 24 वर्षांच्या तरुणीला पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी उल्हासनगरातील भाजप आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, तसंच कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी धर्मांतराची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली. तसेच, गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली, असा आरोप करत भाजपा आमदार नितेश राणे उल्हासनगर पोलिसांवर भडकले. तसेच, याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नेमके प्रकरण काय ?

- Advertisement -

उल्हासनगरमध्ये एका धर्माच्या 26 वर्षीय तरुणाने दुसऱ्या धर्मातील एका 24 वर्षांच्या तरुणीला पळवून नेल्याची घटना घडली होती. एका दुकानात एकत्र काम करत असताना या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र घरच्यांचा संभाव्य विरोधामुळे दोघेही पळून गेले. त्यानंतर 8 ऑक्टोबरला उल्हासनगर पोलीस ठाण्यात तरुणीच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांना तपासाला सुरूवात केली. त्यानंतर संबंधित तरुणी या तरुणासोबत आधी केरळ आणि तिथून पश्चिम बंगालला गेली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यातील नानूर इथे जाऊन या तरुण आणि तरुणीची भेट घेतली. त्यावेळी त्या तरुणीने आम्ही लग्न करणार असून आम्हाला परत येण्याची इच्छा नसल्याचा जबाब पोलिसांना दिला. यावेळी तरुणी सज्ञान असल्यामुळे पोलीस तिच्या इच्छेविरुद्ध तिला परत आणले नाही.

या घटनेनंतर याबाबत उल्हासनगरातील भाजप आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, तसेच कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आरोपीसारखी वागणूक देत मारहाण केली. तसेच, त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला.

- Advertisement -

या प्रकारानंतर नितेश राणे यांनी आज उल्हासनगर पोलीस ठाण्यात येत सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश फुलपगारे यांची भेट घेतली. या भेटीत नितेश राणे यांनी पोलिसांना फैलावर घेतले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना उत्तर दिली. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे नितेश राणे यांनी आता या अधिकाऱ्यांविरोधात थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.


हेही वाचा – गुगलवर पुन्हा एकदा कारवाई; 936 कोटींचा ठोठावला दंड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -