घरमहाराष्ट्रभाजपा खासदार गिरीश बापट यांचं निधन, 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भाजपा खासदार गिरीश बापट यांचं निधन, 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

पुणे – भाजपा खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट आजारी होते. काल रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, आता काही वेळापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

हेही वाचा – Girish Bapat passed away: संघ स्वयंसेवक, कामगार नेते ते खासदार ‘अशी’ राहिली गिरीश बापटांची चार दशकांची कारकिर्द

दीर्घकाळापासून आजारी असतानाही त्यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या काळात प्रचारसभेत सहभाग घेतला होता. नाकात नळी, बोटाला ऑक्सिमीटर लावून त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं होतं. प्रकृती नाजूक असतानाही त्यांनी प्रचार सभेत हजेरी लावल्याने सर्वांनी त्यांच्या उत्साहाचं कौतुक केलं होतं. परंतु, त्यानंतर लागलीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी सर्वपक्षीय अनेक नेत्यांनी गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी गिरीश बापटांची भेट घेतली होती.

- Advertisement -

कसबा पेठ विधानसभेतील किंगमेकर म्हणून खासदार गिरीश बापट यांची ओळख होती. ते मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. नगरसेवक पदापासून स्वतःच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. पुढे १९९५ साली पहिल्यांदा त्यांनी आमदारकीची निवडणूक लडवली. त्यानंतर सलग पाच वेळा ते कसबा पेठेत आमदार म्हणून राहिले.

१९९६ साली गिरीश बापटांनी लोकसभेसाठीही नशिब आजमावलं होतं. परंतु, त्यावेळी त्यांचा पराभव झाला. परंतु, २०१९ मध्ये त्यांनी लोकसभेसाठी पुन्हा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा तब्बल ९६ हजार मतांनी पराभव केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -