घरमुंबईBMC Budget 2022 Live Updates : बजेटमधून मुंबईकरांना फक्त स्वप्न दाखवलंय -...

BMC Budget 2022 Live Updates : बजेटमधून मुंबईकरांना फक्त स्वप्न दाखवलंय – विरोधी पक्षनेते रवी राजा

Subscribe

बजेटमधून मुंबईकरांना फक्त स्वप्न दाखवलंय- रवी राजा


विकास कामांचा ‘बोलाचा भात बोलाची कढी’- भालचंद्र शिरसाट

- Advertisement -

मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या कचऱ्यातून मिळवणार उत्पन्न

मुंबईत जवळपास 300 टन ओला कचरा निर्माण होतो. बहुतांश कचरा बीएमसीद्वारे नेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते, यामुळे वापरकर्ता शुल्क आणि प्रक्रिया व निष्कसन आकार आकारणार पालिका यातून 26 कोटी वार्षिक उत्पन्न मिळवणार आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी 6,933.75 कोटींची तरतूद

टोटल बजेटमध्ये आरोग्यासाठी 15 टक्के


अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी केलेल्या आर्थिक तरतूदी 

कोस्टल रोड – ३,२०० कोटी रुपये

आरोग्य सुविधा – २,६६०.५६ कोटी रुपये

रस्ते, वाहतूक प्रचालन – २२०० कोटी रुपये

पाणी पुरवठा – १,६८२.७८ कोटी रुपये

पूल खाते – १,५७६.६६ कोटी रुपये

पर्जन्य जलवाहिन्या -१,५३९.७९ कोटी रुपये

मलनि:सारण प्रकल्प – १,३४० कोटी रुपये
(सांडपाणी प्रकिया केंद्र)

गोरेगाव – मुलुंड लिंक रोड १३०० कोटी रुपये

आश्रय योजनेअंतर्गत साफसफाई
खात्यातील कर्मचारी वर्गाच्या वसाहतीचा पुनर्विकास -: १३०० कोटी रुपये

मलनि:सारण – ११६९.९२ कोटी रुपये

विकास नियोजन खाते – १००२.१५ कोटी रुपये

प्राथमिक शाळा दुरुस्ती – ५०० कोटी रुपये

पालिका मालमत्ता,
गलिच्छ वस्त्या दुरुस्ती – ४०४.७६ कोटी रुपये

घन कचरा व्यवस्थापन, परिवाहनव घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प – ३७७.८८ कोटी

एकूण -: २२,६४६.७३ कोटी रूपये


राणी बागेसाठी सन २०२१-२२ च्या सुधारीत अर्थसंकल्पात ₹३०.६६ कोटी आणि सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ११५.४६ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.


सन २०२२ मध्ये येणाऱ्या पावसाळ्यात मोठे नाले, छोटे नाले आणि मिठी नदीपासून गाळ काढण्यासाठी अनुक्रमे १८० कोटी, २११० कोटी आणि ₹४६ कोटी इतकी प्रस्ताविण्यात आली

सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १९८५.०६ कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती, ती सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजात २१३९१.९२ कोटी इतकी प्रस्ताविण्यात आली आहे.

पर्जन्य जलवाहिन्यांच्या विविध भांडवली कार्याकरीता सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात २१५३९.७९ कोटी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.


मिठी नदीच्या पुनरुज्जीवनकरणासाठी ५६५.३६ कोटी इतकी तरतूद

आजमितीस मिठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे काम ९५ टक्के आणि संरक्षक भिंत बांधण्याचे ८० टक्के काम पूर्ण झाल्यामुळे मिठी नदीची धारण क्षमता दुपटीने आणि वहन क्षमता तीन पटीने वाढली

मिठी नदीच्या विकासाचा आणि नदीतील प्रदूषण नियंत्रणाचा आराखडा तयार करण्यात आलेला असून त्याची अंमलबजावणी चार पॅकेजमध्ये प्रस्ताविण्यात आली आहे.

पॅकेज- १ अंतर्गत मिठी नदीच्या फिल्टर पाडा ते डब्लू.एस. पी. कंपाऊंड, पवई येथे इंटरसेप्टर चे बांधकाम करणे, मलनि:सारण वाहिनी टाकणे, सर्व्हिस रोडचे बांधकाम करणे आणि ८ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम करणे या कामांचा खर्च ₹१३३ कोटी अपेक्षित असून सदर खर्चामध्ये १५ वर्षे प्रचालन व परिरक्षणाच्या खर्चाचा समावेश आहे. सदर काम प्रगतीपथावर,

पॅकेज-२ अंतर्गत डब्लू.एस.पी. कंपाऊंड पवई ते सीएसटी रस्ता, कुर्ला येथे संरक्षक भिंत, सेवा रस्ता, इंटरसेप्टर आणि मलनिःसारण वाहिनी टाकणे यासाठी ₹५७० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. सदर कामे प्रगतीपथावर ,

पॅकेज-३ अंतर्गत सी.एस.टी रोड, कुर्ला ते माहिम कॉजवे दरम्यान संरक्षण भिंत व सेवा रस्त्याचे बांधकाम करणे, मलनिःसारण वाहिनी टाकणे, इंटरसेप्टर गेटपप्स (‘फ्लड गेटस’ पंपिंग यंत्रणेसह) बांधणे, सुशोभिकरणासह प्रॉमेनेडस्चे बांधकाम आणि इतर कामे यासाठी एकूण ₹२१५६ कोटी एवढा खर्च अपेक्षित असून सदर खर्चामध्ये १० वर्षाच्या प्रचालन व परीरक्षणाच्या खर्चाचा समावेश आहे. सदर कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर

पॅकेज-४ मध्ये बापट नाला ते सफेद पूल नाला ते धारावी मलजल प्रक्रिया केंद्र, येथील बोगद्याच्या बांधकामासाठी ₹४५५ कोटी खर्च अपेक्षित आहे. सदर काम प्रगतीपथावर आहे. सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ₹५६५.३६ कोटी इतकी तरतूद


मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प कोस्टल रोड

मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या सर्वात प्रतिष्ठित प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे बहुसंख्य नागरिकांच्या वेळेसह इंधनाचीही बचत होण्यास मदत होईल.

मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प बांधकामाचा मूळ खर्च ₹८४२९.४४ कोटी आहे

आणि कर, पर्यवेक्षण आकार, सल्लागारांचे शुल्क आणि इतर आकारासह एकूण खर्च ₹१२९५० कोटी इतका आहे.

पॅकेज I, II व IV च्या सर्व कामांची सुरुवात झाली आहे आणि आजपर्यंत ५०% प्रगती

पॅकेज IV मध्ये, प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटीपर्यंतच्या २०७२ मीटरच्या पहिल्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले


शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प शिक्षण समितीपुढे सादर

राज्य शासनाकडून पालिकेला थकबाकी ₹६७६८.१६ कोटी येणे बाकी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर इत्यादीपोटी दि. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ₹६७६८.१६ कोटी इतके येणे आहे

ज्यामध्ये राज्य शासनाच्या शिक्षण खात्याकडून सहाय्यक अनुदानापोटी ₹४८४०.६१ कोटी येणे असलेल्या रकमेचा अंतर्भाव आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेस देय असलेल्या रकमांच्या वसुलीबाबत / समायोजनेबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित खात्यांकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत आहे.-


२०२१-२२ या आर्थिक वर्षाचे महसूली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज ₹२७८११.५७ कोटी वरुन ₹३७५३८.४१ कोटी असे सुधारीत करण्यात आले असून त्यामध्ये ₹९७२६.८४ कोटी इतकी वाढ झाली आहे.

दि. ३१.०१.२०२२ पर्यंत ₹३०८५१.१८ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे.

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता अंदाजित महसूली उत्पन्न ₹३०७४३.६१ कोटी एवढे प्रस्ताविले असून ते सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत ₹२९३२.०४ कोटीने जास्त आहे.

सन २०२२-२३ चे अर्थसंकल्पीय अंदाज ₹४५९४९.२१ कोटी

सन २०२१-२२ च्या ₹३९०३८.८३ कोटी इतक्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत १७.७०% ने जास्त

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी टॅब देण्यात येणार असून त्यासाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे

शाळांमधील आगीचे प्रकार रोखण्यासाठी पालिका अग्निशामक साहित्य उपकरणांची खरेदी करणार 

आग लागण्याचे प्रकार वाढल्यानंतर पालिका शाळांसाठी आधुनिक अग्निशामक साहित्य / उपकरणांची खरेदी करणार

महानगरपालिकेच्या सर्व शालेय इमारती करिता अग्निशमन को पुरविण्यात आले आहेत. मात्र सद्या बाजारात सुलभ व सुरक्षित अशी ५०० मि.लि. ची जेटकुल जेल अग्निशमक यंत्रे उपलब्ध असून त्याद्वारे आग जलदगतीने विझवली जाऊन झटपट कूलींग होते.

बर्निंग तापमान १००० से. असले तरीही ते ३० से. पर्यंत कमी केले जावू शकते.

सदर यंत्र वापरास सुलभ व सोपे असल्याने याचा उपयोग विद्यार्थी देखील करु शकतील.

महानगरपालिका शाळांमधील वर्ग खोल्या, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळ कार्यालय इ. ठिकाणी वापर करण्यासाठी काही ठराविक शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर जेटकुल जेल अग्निशमक यंत्रे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या शिफारशी नंतर खरेदी करण्यात येणार आहेत.

कौशल्य प्रशिक्षणासाठी १.४० कोटी

शिक्षण विभागांच्या उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी १ कोटींची तरतूद

केंब्रिज विद्यापिठाशी संलग्नित आयजीएसई शिक्षण मंडळाच्या शाळांची उभारणीसाठी 15 कोटींची तरतूद

माध्यमिक शाळांत परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य 28 लाख

10 हजार पोलिमार डेस्क बेंच 3 कोटी 29 लाख

खासगी शाळांना अनुदान – 414.37 कोटी

ग्रंथ संग्रहालयांना अनुदान – 1 कोटी

 बालवाडी वर्गाना अनुदान- 9.05 कोटी

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी 2.37 कोटी रुपयांची तरतूद 

मुलींना उपस्थिती भत्त्यासाठी 54 कोटी रुपयांची तरतूद 

आय.जी.सी.एस.ई. ( International General Certificate of Secondary Education) व आय. बी (International Baccalaureate) शिक्षण मंडळाच्या शाळांची उभारणी करणार

टॉय लायब्ररीमुळे इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

ऑलिंपियाड परीक्षांसाठी 50 लाख रुपयांची तरतूद

चित्रकला स्पर्धांसाठी 50 लाख रुपयांची तरतूद

संगीत अकादमीसाठी 14 लाख रुपयांची तरतूद

कार्यानुभव ऑनलाईन शिक्षणासाठी 19 लाख रुपयांची तरतूद

आधुनिक शिक्षण , व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरसाठी 26 .25 + 11.77 कोटींंची  तरतूद

 विचारशील प्रयोगशाळांसाठी 29 लाख रुपयांची तरतूद

प्रशिक्षण व उपक्रमांसाठी 16 लाख रूपयांची तरतूद 

स्काऊट व गाईड विभाग -: 82 लाख रुपये

जिल्हा प्रशिक्षण केंद्राद्वारे आयोजित प्रशिक्षण 9 लाख रुपये

शालेय इमारती दुरुस्ती ४१९.२० कोटी तरतूद

संगणकीय प्रयोगशाळा अद्यावतीकरण -: 11.20 कोटी रुपये

शाळा व्यवस्थापन माहिती यंत्रणा 57 लाख

शाळांमध्ये हाऊसकिपिंग – ७५ कोटी

शिक्षक महापौर पुरस्कार -14 लाख रुपये

विद्यार्थ्यांना टॅब पुरवठा -7 कोटी रुपये

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य – 100 कोटी रुपये

विद्यार्थ्यांना खगोलीय घडामोडीचे ज्ञान व त्या विषयातील जिज्ञासा वृत्ती वाढवण्याकरता महापालिकेच्या शाळांमध्ये 25 खगोलीय प्रयोगशाळा प्रायोगिक तत्त्वावर स्थापन करणार

शॉर्ट शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कौशल्य विकास प्रयोगशाळेची उभारणी करण्यात येणार आहे त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 1. 40 कोटी

कोविड प्रतिबंधासाठी आरोग्य विषयक साधनांचा पुरवठा करणार

१) 2021-22 शैक्षणिक वर्षामध्ये पालिकाचे सर्व शाळांमध्ये मिळून 26 हजार 449 इतकी विद्यार्थ्यांची वाढ झाली.

२) मुंबई महापालिका शिक्षण खात्याचा सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सह आयुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना गुरुवारी सकाळी १०.१८ वाजता सादर केला.

३) 2021-22 आर्थिक वर्षाचे महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज 2701.77 कोटी एवढी असून, 2022-23 आर्थिक वर्षाकरिता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज 2870.24 कोटी प्रस्तावित करण्यात आलेत.

४) शिक्षण खात्याचा यंदाचा अर्थसंकल्प ३३७०.२४ कोटींचा आहे

५) महसुली खर्च २८७०.२४ कोटी रुपये


मुंबई महानगर पालिकेचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज म्हणजे 3 फेब्रुवारीला सादर होणार आहे. पालिकेची निवडणुक तोंडावर असल्याने या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालेय. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा आवाका देशातील काही राज्यांपेक्षाही मोठा असतो. अर्थसंकल्पात काही नवीन योजना, प्रकल्प, विकासकामे, संकल्पना राबविण्यावर जोर दिला जाण्याची दाट शक्यता आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -