घरताज्या घडामोडीBMC : पालिकेने गेल्या ३२ वर्षात बनवले ९३८ किमीचे सीसी रोड

BMC : पालिकेने गेल्या ३२ वर्षात बनवले ९३८ किमीचे सीसी रोड

Subscribe

मुंबई महापालिकेने डांबरी रस्त्यांची वारंवार करावी लागणारी दुरुस्ती, खड्ड्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी सीसी रोडची कामे हाती घेतली. त्यानुसार १९८९ पासून ते आजपर्यंत पालिकेने शहर व उपनगरे याठिकाणी लहान – मोठे असे ९३८.८७ किमीचे सीसी रोड बनविले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

थोडक्यात म्हणजे गेल्या ३२ वर्षात पालिकेने सरासरी २९ किमी सीसी रोडची कामे दरवर्षी केल्याचे समोर येत आहे. तर याउलट २०२० व २०२१ मध्ये २०० किमी सीसी रोड पैकी १६३ किमीचे रोड तयार केले असून आता सन २०२२ मध्ये २२६ किमी लांबीचे सीसी रोड बनविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहेत. म्हणजेच १९८९ पासून ते २०१९ या ३० वर्षात ७३८ किमी सीसी रोडची कामे झाली असून केवळ २०२० व २०२१ एवं २ वर्षात १६३ किमी लांबीच्या सीसी रोडची कामे झाल्याचे समोर येत आहे. त्यात जर २०२२ मधील हाती घेणारी कामे जोडली गेली तर गेल्या ३ वर्षात ४२६ किमी लांबीचे सीसी रोड पूर्ण होणार आहेत.

- Advertisement -

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात डांबरी रस्त्यांवर खड्डे पडून रस्ते खराब होतात. अनेक ठिकाणी भूमीगत केबल लाईन टाकण्यासाठी चर खोदण्यात येतात. मात्र त्याचे पैसे संबंधित केबल खोदकाम करणाऱ्या कंपनीकडून पालिकेला भरूनही सदर चर वरवरकरणी भरले जातात. त्यामुळे खोदकाम केल्याने आणि चर नीटपणे न भरल्याने सदर डांबरी रस्ते खराब होतात. त्या रस्त्यांवर लहान -मोठे खड्डे निर्माण होऊन त्याचा त्रास वाहनांना, वाहन चालकांना, पादचाऱ्यांना होतो.

त्यामुळे पालिकेचे रस्ते कामावरील कोट्यवधी रुपये वाया जातात. पालिकेने डांबरी रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येपासून दिलासा मिळण्यासाठी व टिकाऊ रस्त्यांसाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविण्याचे काम हाती घेतले होते. डांबरी रस्त्यांचा हमी कालावधी किमान ३ वर्षे तर सीसी रोडचा हमी कालावधी किमान ५ वर्षे आहे.

- Advertisement -

पालिका रस्त्यांचा हमी कालावधी संपला की , रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पुन्हा नव्याने करते. त्यामुळे रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना नवीन रस्त्यांची कामे मिळतात, जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे व खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची कामे, असा कोट्यवधी रुपयांचा मलिदा कंत्राटदारांच्या खिशात जातो.


हेही वाचा : कोळसा खाणींचा लिलाव! महाराष्ट्रातील माजरा येथील 31.036 दशलक्ष टन कोळशाचे साठे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -