Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र मुंबई योग्य व्यक्तींच्या हाती; लकी अलींने केले मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक

मुंबई योग्य व्यक्तींच्या हाती; लकी अलींने केले मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक, छायाचित्रकार आणि अभिनेते लकी आली यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुक करत मुंबई योग्य व्यक्तींच्या हातात असल्याचे म्हटले आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि संगीतकार लकी अली यांच्यात संगीत आणि छायाचित्रण या विषयांव प्रदीर्घ चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही यावेळी उपस्थित होते. लकी अली यांनी आदित्य ठाकरे यांचंही कौतुक केलं आहे.

bollywoods singer lucky ali meets chief minister of maharashtra uddhav thackeray and aaditya thackeray
हे शहर योग्य व्यक्तींच्या हातात आहे याचा मला आनंद आहे अशा शब्दात लकी अली यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे लकी अली यांनी आनंद व्यक्त केला. यावर बोलताना लकी अली म्हणाले की, “मला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा सन्मान आणि सौभाग्य मिळाले. कलाकार म्हणून आम्ही अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. यामुळे आम्हाला काही क्षण शेअर करता आहे.” तसंच संगीत आणि फोटाग्राफीवर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. लकी अली यांनी आदित्य ठाकरे यांचेही कौतुक केले. “आदित्य ठाकरे हे एक हसतमुख आणि मनमोकळं उत्साही व्यक्तिमत्त्व आहे. ते मला स्वत: कारपर्यंत सोडायला आले. तसंच कारचा दरवाजा उघडून दिला. यावरून त्यांच्या मनातील ज्येष्ठांबद्दल असणारा आदर दिसून आला” असेही ते म्हणाले. “मुंबई ही माझी जन्मभूमी आहे. हे शहर योग्य व्यक्तींच्या हातात आहे याचा मला आनंद आहे” अशा शब्दात लकी अली यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.


 

- Advertisement -