घरमहाराष्ट्रपुण्यातील वनखात्याच्या कार्यालयात बॉम्बचा स्फोट

पुण्यातील वनखात्याच्या कार्यालयात बॉम्बचा स्फोट

Subscribe

पुण्यातील पौड येथे वनखात्याच्या कार्यालयात गावठी बॉम्बचा स्फोट झाला असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पुण्यातील पौड येथे वनखात्याच्या कार्यालयात आज गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारस ही घटना घडली असून सुदैवीने यावेळी कार्यालयात कुणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. पण या बॉम्बस्फोटामुळे कार्यालयाचे आणि इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

नेमके काय घडले?

काही दिवसांपूर्वी ताम्हिणी अभयारण्यात रानडुक्करांना मारण्यासाठी काही शिकाऱ्यांनी गावठी बॉम्ब पेरले होते. पण वनखात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी अभयारण्यातील हे बॉम्ब तात्काळ जप्त केले होते. जवळजवळ सत्तरहून अधिक बॉम्ब हे त्यावेळी जप्त करण्यात आले होते. हे बॉम्ब अभयारण्यात अशा पद्धतीने पेरले गेले होते की, ते खाद्य असावे, असे रानडुक्करांना वाटते. त्यामुळे रानडुक्करांनी हे बॉम्ब खाद्य म्हणून खाण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा तात्काळ स्फोट होतो आणि त्यामुले रानडुक्करांचा मृत्यू होतो.

- Advertisement -

दरम्या, हे जप्त करण्यात आलेले बॉम्ब पुण्यातील पौड येथील एका इमारतीत असणाऱ्या वनखात्याच्या कार्यालयात आणून ठेवले होते. या स्फोटचा आज पहाटे अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये कार्यालयाचे आणि इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. कार्यालयातील खिडक्या, दरवाजे यांचा अक्षरश: चुरडा झाला आहे. दरम्यान स्फोट नेमका कसा झाला याबाबत अद्याप तरीही काहीही कळू शकलेले नाही. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास देखील सुरू केला असल्याचे समोर आले आहे.


वाचा – जैशचे तळ उध्वस्त करणाऱ्या ‘त्या’ बॉम्बची भारत पुन्हा करणार खरेदी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -