घरCORONA UPDATEभयंकर! कर्मचाऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझर टाकले

भयंकर! कर्मचाऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझर टाकले

Subscribe

पैशाच्या वादावरून पुण्यातील कोथरूड येथे एका इसमाचा शारीरिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंबंधीची तक्रार रविवारी दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. लॉकडाऊनच्या काळात दिल्लीमध्ये अडकल्याने पैसे परत न करू शकणाऱ्या ३० वर्षीय कर्मचाऱ्याचे अपहरण करून तीन जणांनी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझर टाकल्याचा किळसवाणा प्रकार या घटनेतून समोर आला आहे. ही घटना १३ ते १४ जूनच्या दरम्यान एजन्सीच्या वर्कशॉप येथे घडली असून यासंबंधीची तक्रार पुण्यातील पौड पोलीस स्थानकात २ जुलै रोजी करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की,

कलाकारांच्या कामाचे प्रदर्शन आयोजित करणाऱ्या या एजन्सीमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम पाहणाऱ्याने ही तक्रार केल्याचे सांगितले जात आहे. मार्च महिन्यात ते दिल्लीला एका ऑफिसच्याच कामानिमित्त गेले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने ते तिथेच अडकून पडले. दिल्लीतील एका लॉजमध्ये रहावे लागल्यामुळे तिथे त्यांचे पैसे खर्च झाले. ७ मे रोजी पुण्यात परतल्यानंतर त्याच्या मालकाने त्याला १७ दिवस क्वारंटाईन होण्यास सांगितले. तिथून बाहेर पडण्यासाठी त्याने आपला फोन आणि डेबिट कार्ड तारण ठेवल्यामुळे त्याच्या पैसे शिल्लक उरले नसल्याचे त्यांने सांगितले. दरम्यान, १३ जूनला कॉर्पोरेटचा मालक आणि त्याच्या साथीदारांनी त्या कर्मचाऱ्याकडे पैशाची मागणी केली. कर्मचाऱ्याला ते एका कार्यालयात घेऊन गेले. तिथे त्याला कैदेत ठेवले. मालक आणि इतर दोघांनी त्याला जबर मारहाण केली. तसेच त्याच्या प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझरची फवारणी केली. त्यानंतर त्याला सोडून दिले. कर्मचारी त्वरीत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला तसेच गुरुवारी त्याने एफआयआर दाखल केली. या प्रकरणी तक्रारदाराने पोलिसांना ही सर्व माहिती सांगितली असून पोलीस याचा तपास घेत आहेत. तर अद्याप या घटनेकरता कोणालाही अटक झालेली नसल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Covid-19 Test मध्ये फिक्सिंग! २,५०० रूपये द्या, कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह मिळवा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -