धक्कादायक : चेंबूर मध्ये शस्त्राचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार

शुक्रवारी रात्री ती काही मित्रांसोबत मरीन ड्राईव्ह येथे फिरण्यासाठी गेली होती.

boy Rape of a young girl in Chembur of showing knives
धक्कादायक : चेंबूर मध्ये शस्त्राचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार

साकीनाका येथील बलात्काराची घटनेला १५ दिवस उलटत नाही तोच चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराची धक्कादायक घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. मित्रांसोबत मारिन ड्राईव्ह येथून येणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर एकाने शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. चेंबूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून एकाला अटक केली असल्याची माहिती परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. या घटनेने पुन्हा एकदा मुंबईत महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी हि २० वर्षाची असून चेंबूर वसाहत या ठिकाणी राहण्यास आहे. शुक्रवारी रात्री ती काही मित्रांसोबत मरीन ड्राईव्ह येथे फिरण्यासाठी गेली होती. शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आणि तिचा एक मित्र चेंबूर येथ घरी परतत असताना चेंबूर कॅम्प येथे पाठीमागून आलेल्या एकाने पीडित तरुणीच्या मित्राला शस्त्राचा धाक दाखवून पळवून लावले, त्यानंतर पीडित तरुणीला शस्त्राचा धाक दाखवत एका निर्जन ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करून तेथून पोबारा केला.

पीडित तरुणीच्या मित्राने चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार दाखल करताच चेंबूर पोलिसांनी ताबडतोब पीडित मुलीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक केली असल्याची माहिती परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपाचे नाव धीरज राजकुमार सिंग (२४) असे असून आरोपी हा तरुणीच्या ओळखीचा असल्याचे समजते. साकीनाका पाठोपाठ चेंबूर येथे शस्त्राचा धाक दाखवून पहाटेच्या सुमारास घडलेल्या बलत्कारच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


हेही वाचा : Narendra Modi in US : अफगाणिस्तानचा वापर दहशतवादासाठी होऊ नये, मोदींचा पाकला ईशारा