घरमहाराष्ट्रविवाहित प्रेयसीसह गुटर गू करायला गेला आणि बाल्कनीतून पडून जीव गेला!

विवाहित प्रेयसीसह गुटर गू करायला गेला आणि बाल्कनीतून पडून जीव गेला!

Subscribe

बाल्कनीतून पळण्याची घाई विवाहित प्रेयसीच्या प्रियकराच्या अंगलट

विवाहित प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराची फजिती झाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. हा प्रकार भंडाऱ्यात घडला असून विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर गेला असताना अचानक पती समोर उभा ठाकल्याने प्रियकराची फजिती उडाली. यावेळी प्रेयसीच्या घरातून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेला प्रियकर धावपळ करताना बाल्कनीतून थेट खाली पडली आणि त्याचा मृत्यू झाला.

असा घडला प्रकार

भंडारा शहराजवळ असणाऱ्या गणेशपूर येथे हा प्रकार घडला असून मेहर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या विवाहित प्रेयसीची भेट घेण्यासाठी महेश वसंत डोंगरवार हा तरुण मध्यरात्री तिच्या घरी धडकला. महेश आणि त्याची विवाहित प्रेयसी बेडरूममध्ये असताना अचानक तिच्या बेडरूमचं दार कोणीतरी ठोठावलं आणि दोघांची धांदल उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, बेडरूम बाहेर तिचा पती येऊन उभा राहिला आणि त्याने दार वाजवलं. यावेळी विवाहित प्रेयसी आणि तिचा प्रियकर बेडरूममध्ये एकत्र होते. त्यानंतर महेश घाई-घाईने बेडरुमच्या बाल्कनीत पळ काढला.

- Advertisement -

बाल्कनीत लपत असताना दरवाजा लावत खाली उतरण्याची त्याने घाई केली. या गडबडीत महेशचा पाय घसरला आणि तो थेट बाल्कनीतून सिमेंटच्या रस्त्यावर पडला. बाल्कनीतून खाली थेट रस्त्यावर पडल्यामुळे महेशला जबर मार बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घडलेल्या प्रकारानंतर विवाहित प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरुन तिच्या प्रियकराची भंडारा शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे भंडाऱ्यात या एकाच प्रकाराची चर्चा सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -