घरमहाराष्ट्रसाखर कारखान्यात बिल्डर, राजकीय नेत्यांची गुंतवणूक

साखर कारखान्यात बिल्डर, राजकीय नेत्यांची गुंतवणूक

Subscribe

राज्यात केवळ जरंडेश्वर हा एकच साखर कारखाना विकला गेलेला नाही. साखर कारखाने चालवायला घेतल्याचे किंवा विकण्यात आलेल्या कारखान्यांची संख्या ६० ते ७० पर्यंत जाऊ शकते. साखर कारखान्यात काही बिल्डर आणि राजकीय पक्षाशी संबंधित लोकांची गुंतवणूक आहे, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

मी बेईमान असल्याची गरळ ओकण्यात येत आहे. पण मी बेईमान आहे की शब्दाचा पक्का आहे हे उभा महाराष्ट्र ओळखतो, असा टोलाही पवार यांनी लगावला. केंद्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर सध्या अजित पवार आणि त्यांचे नातेवाईक आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना पवार यांनी आरोप करणार्‍या विरोधकांचा समाचार घेतला.

- Advertisement -

काही जण फक्त कागदपत्रे दाखतात. त्यांनी केलेल्या आरोपात पुरावा बघितला जाईल. नुसत्या बिनबुडाच्या आरोपाला अर्थ नसतो. या प्रकरणात अनेकांनी पूर्वीच्या सरकारमध्ये असताना चौकशी केलेली आहे. सीआयडी, एसीबी, ईओडब्ल्यू यांनीही चौकशी केली आहे. सहकार विभागाने एका न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी केली आहे,असेही पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -