घरमहाराष्ट्रशिवाजी महाराजांसाठी गुंडगिरी केलेली मला चालेल - जितेंद्र आव्हाड

शिवाजी महाराजांसाठी गुंडगिरी केलेली मला चालेल – जितेंद्र आव्हाड

Subscribe

होय, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चुकीचा इतिहास दाखविणारा सिनेमा बंद करणारा गुंड आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसेंना केलेल्या मारहाण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. दरम्यान या सुनावणीत राज्य सरकारला त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यावर राज्य सरकार म्हणाले, याप्रकरणी तुम्ही फेरचौकशी द्या किंवा सीबीआय द्या आमचे काही म्हणणे नाही. त्यावर न्यायाधीशही हसले असे आव्हाड म्हणाले,

याच संदर्भांत जितेंद्र आव्हाड म्हणाले, हा गुन्हा घडून पावणे तीन वर्षे झाली. चार्जशीट कोर्टात दाखल झाली. सरकारने उच्च न्यायालयात शपथपत्रावर लिहून दिले. निकाल जाहीर झाला आहे. जो तपास झाला तो चुकीचा होता, त्यात काही त्रुटी राहिल्यात असे राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात सांगावे लागेल. सरकार बदलते पण पोलीस बदलत नाही. पोलिसांनी खोटे काम केले असे जर सर्वोच्च न्यायालयात म्हटले गेले तर त्याचे दूरगामी परिणाम मला अडकवण्यासाठी होणार असेही ते म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान याच संदर्भात जितेंद्र आव्हाड म्हणाले, जर का मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला तर महाराष्ट्रातुन काय रिएक्शन येईल. मी तर मुख्यमंत्र्यांपेक्षा लाहान कार्यकर्ता आहे. मलाही मानणारे 4 लोक आहेत. तुमचा असा फोटो टाकला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल. मी माणूस नाही का? त्यामुळे एखादी बाजू मांडताना बाकीच्या बाजूंचाही विचार करावा लागतो असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. त्याचसोबत राज्य सरकार आपल्याविरोधात असेल तर आपल्याला लढा द्यायचा आहे. त्यामुळे जेव्हा मानसिकदृष्ट्या तयारी असते तेव्हा जेलचे दरवाजे आणि लोखंडी सळ्या यांचे काही वाटत नाही. मी खून, बलात्कार केला नाही असे आव्हाडांनी सांगितले.

त्याचसोबत सुप्रीम कोर्टात वकिलांनी 72 तासांच्या गुन्ह्याचाही उल्लेख केला. जितेंद्र आव्हाड गुंड आहे तर होय, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चुकीचा इतिहास दाखविणारा सिनेमा बंद करणारा गुंड आहे. शिवाजी महाराजांसाठी केलेली गुंडगिरी मला चालेल. पण मी चुकीचा इतिहास दाखवू देणार नाही आणि जो असे करेल त्याला ते भोगावे लागेल असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकार जे काही म्हणाले ते हास्यास्पद होते. स्वत: न्यायाधीशही त्यावर हसले. हे राज्य सरकार कसे मागे लागले. ते संपूर्ण ठाण्याला आणि महाराष्ट्राला माहिती आहे.

- Advertisement -

एखादा माणूस 4 वर्षे माझा पाठलाग करतो. त्याने अनेक गोष्टी लपवून ठेवल्या आहेत असे निरीक्षण अनंत करमुसेबद्दल न्यायाधीशांनी मांडले आहे. करमुसेने पहिला एफआयआर दिला तो सगळ्यांसमोर आहे. त्यानंतर त्याला कोण काय बोलले मला सगळे माहित आहे. 10 दिवसांनी स्टेटमेंट बदलतो तो विचार करून केलेला असतो. हायकोर्टाने करमुसेचे म्हणणे खोटे असल्याचे म्हटले आहे.


हे ही वाचा –  “माय मराठी”ला नख लावाल तर अंगावर जाऊ…; मराठी गाण्यावरून मनसे आक्रमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -