घरमहाराष्ट्रमुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग कार; चालकाचा होरपळून मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग कार; चालकाचा होरपळून मृत्यू

Subscribe

धावत्या कारमध्ये भीषण स्फोट झाला त्यानंतर कारला आग लागली. आगीमध्ये चालकाचा होरपळून मृत्यू झाला.

मुंबई-गोवा महामार्गावर कारमध्ये स्फोट होऊन आग लागली. या आगीमध्ये चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील बोरज गावाजवळ सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. धावत्या कारमध्ये भीषण स्फोट झाला त्यानंतर कारला आग लागली. आग एवढी भीषण होती की या आगीमध्ये चालकाचा होरपळून मृत्यू झाला.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐवढा मोठा होता की, या स्फोटाच्या आवाजाने बोरजगाव हादरले. स्फोटाचा आवाज येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. या आगीमध्ये कारचालकाचा होरपळून मृत्यू झाला. कार चालकाच्या मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला. दरम्यान, स्थानिकांनी पाण्याच्या टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. कारची आग विझवल्यानंतर कारमधील चालकाचा मृतदेह पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढला. गाडी कोणाची होती, चालक कोण होता, हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – 

गोव्यात कारचा भीषण अपघात; तीन ठार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -