घरताज्या घडामोडीआर्थिक संकटामुळे व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच पेटवून घेतलं, पत्नी, मुलालाही मारण्याचा केला प्रयत्न

आर्थिक संकटामुळे व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच पेटवून घेतलं, पत्नी, मुलालाही मारण्याचा केला प्रयत्न

Subscribe

एका व्यावसायिकाने स्वत:ला कारमध्येच जाळून घेतल्याची घटना नागपुरमध्ये घडली. रामराज भट असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे.

एका व्यावसायिकाने स्वत:ला कारमध्येच जाळून घेतल्याची घटना नागपुरमध्ये घडली. रामराज भट असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. विशेष म्हणजे रामराज भट या व्यावसायिकाने स्वत:ला पेटवून घेत स्वत:च्या पत्नी आणि मुलाला देखील जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुदैवाने रामराजचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि दोघेही त्यातून बचावले.

रामराज भट हे पत्नी संगीता आणि मुलगा नंदन यांच्यासोबत खापरी पुनर्वसन परिसरात गेले होते. त्यावेळी रामराज यांनी कुटुंबासह सामूहिक आत्महत्या (Mass Suicide) करण्याचा प्रयत्न केला. नागपुरमधील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आर्थिक संकट असल्यामुळे रामराज भट या व्यावसायिकाने हे पाऊल उचलल्याची माहिती मिळते.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी पत्नी आणि मुलासोबत भट कारमधून निघाले होते. जवळपास रात्री १ वाजताच्या सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी आणि मुलाला अॅसिडिटीच्या औषधाच्या नावावर विष पिण्यासाठी दिले. परंतु, पत्नी आणि मुलाला संशय आला. औषधाचा रंग काळा असल्याने मुलाने ते घेण्यास नकार दिला. यानंतर भट यांनी त्यांच्याजवळ असलेल्या बाटलीतील द्रवपदार्थ तिघांवरही फवारला. पत्नी आणि मुलाला काही कळण्याआधीच त्यांनी कार पेटवून दिली. यात तिघेही भाजले, ज्यात रामराज भट यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

या घटनेत पत्नी आणि मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर खापरी इथल्या स्वामी विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रामराज भट यांचा नट-बोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता. विविध कंपन्यांना ते नट-बोल्टचा पुरवठा करत होते. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे रामराज भट यांच्यावर आर्थिक संकट ओढावले होते. तसेच, त्यांचा मुलगा नंदन इंजिनियर होता. रामराज नंदनला काम करण्याची विनंती करत होता, मात्र त्याने नकार दिला होता. त्यामुळे भट अधिकच चिंतेत होते.


हेही वाचा – वाधवान बंधूंच्या अडचणीत वाढ; सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी आठ दिवसांची सीबीआय कोठडी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -