घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकरियरच्या संधी : समाजसेवेची आवड आहे? मग, घडवा त्यातच आपले करियर, 'हा'...

करियरच्या संधी : समाजसेवेची आवड आहे? मग, घडवा त्यातच आपले करियर, ‘हा’ आहे अभ्यासक्रम

Subscribe

नाशिक : समाजसेवा हा आता ‘घर घालू उद्योग’ राहिलेला नाही. व्यावसायिक समाज कार्य करुन ‘स्वार्थातून परमार्थ’ साधण्याचा संधी समाजकार्य महाविद्यालयांतून उपलब्ध आहे. यात व्यावसायिक पद्धतीने समाजकार्य करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याच अभ्यासक्रमानंतर स्वयंसेवी संस्था अर्थात एनजीओ उत्तम रितीने चालवता येते.

आवश्यक कौशल्य :

  • या कोर्सला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये समाजाबद्दल आपुलकी असली पाहिजे
  • जनतेशी संवाद साधण्याकरिता त्यांच्याकडे उत्तम संवादकौशल्य पाहिजे
  • विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची आवड पाहिजे
  • त्यांना सामाजिक घडामोडींची प्राथमिक माहिती असायला हवी
  • समाजासाठी कष्ट करण्याची तयारी असावी
  • केव्हाही आणि कुठेही मिळेल ते काम करण्याची तयारी असावी

समाजकार्याचे काही कोसेर्स :

  • बॅचलर इन सोशल वर्क (बीएसडब्ल्यू)
    बीएसडब्ल्यू कोर्समध्ये सहा सत्रांचा समावेश होतो. या प्रत्येक सत्रात सहा वेगवेगळे विषय असतात . यात सोसायटी, इंग्लिश, सोशल प्रॉब्लेम्स, पॉलिटिक्स, एज्युकेशन सिस्टीम अँड सर्व्हिसेस इत्यादी विषयांचा समावेश आहे . या विषयामधून विद्यार्थ्यांना समाजसेवेशी निगडीत अनेक गोष्टींची माहिती मिळते
    कालावधी : ३ वर्षं
    पात्रता : बारावी पास, कोणत्याही शाखेचे विद्यार्थी
  • मास्टर इन सोशल वर्क (एमएसडब्ल्यू)
    कालावधी : २ वर्षं
    पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीला , किमान ५० टक्के मार्क्स असले पाहिजे
  • शॉर्ट टर्म डिप्लोमा/ सटिर्फिकेट कोसेर्स
    डिप्लोमा इन सोशल वर्क
    कालावधी : १ वर्षं
    पात्रता : बारावी
  • सटिर्फिकेट इन थेरॅप्युटिक स्किल्स फॉफ हेल्पिंग प्रोफेशनल्स
    कालावधी : सहा महिने
    पात्रता : पदवीधर ,सोशल वर्कर, डॉक्टर, शिक्षक किंवा कोणत्याही सेवा क्षेत्रातील कर्मचारी
समाजसेवेचे शिक्षण देणार्‍या काही प्रख्यात संस्थां:
  • मविप्र संचलित समाजकार्य महाविद्यालय, नाशिक
  • द कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन मुंबई
  • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस

संधी :

  • शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी विविध सेवाभावी संस्थांमध्ये काम करू शकतात.
  • विविध बिगरसरकारी संस्था, सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्स, प्रशिक्षण संस्था इत्यादी ठिकाणी काम करण्याची संधी
  • समाजसेवेशी संबंधित प्रशिक्षण देणार्‍या विविध कॉलेजे आणि संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम करण्याची संधी
  • ग्रामसेवकांच्या भरतीत सरकारमान्य संस्थेची बीएसडब्ल्यू पदवी मिळविलेले उमेदवार सहभागी होऊ शकतात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -