घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरChhatrapati Sambhajinagar : GST घोटाळ्यातील पैसा टेरर फंडिंगसाठी? पोलिसही करणार चौकशी

Chhatrapati Sambhajinagar : GST घोटाळ्यातील पैसा टेरर फंडिंगसाठी? पोलिसही करणार चौकशी

Subscribe

Chhatrapati Sambhajinagar : डिसेंबर 2022 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) जीएसटी विभागाने (GST Department) केलेल्या एका कारवाईत बनावट बिलांचा महाघोटाळा समोर आला होता. राज्य कर जीएसटीच्या औरंगाबाद कार्यालयाने केलेल्या तपासणीत 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 500 कोटींची बनावट बिलं समोर आली आहे. या प्रकरणी तपास करताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या जीएसटी घोटाळ्यातील पैशाचा वापर टेरर फंडिंगसाठी (Terro Funding) होत असल्याचा संशय जीएसटी विभागाला असल्यामुळे त्या दिशेने तपास करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात संयुक्तिक तपास करण्यासाठी जीएसटी विभागाने पोलिसांना (Police) पत्र पाठवले आहे. (Chhatrapati Sambhajinagar GST scam money for terror funding The police will also investigate)

हेही वाचा – आमच्या राज्यातील हस्तक्षेप ठरेल; केसीआर यांच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वक्तव्यावर राऊतांचा टोला

- Advertisement -

काय आहे प्रकरण? 

छत्रपती संभाजीनगरच्या स्टेट जीएसटी विभागाने डिसेंबर 2022 मध्ये बोगस कंपन्या स्थापन करुन इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेत 1 हजार कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणाची व्याप्ती आता हजार कोटींच्या पुढे गेली आहे. तसेच या घोटाळ्याचे धागेदोरे गुजरातसह देशातल्या विविध राज्यांत असल्याची शक्यता आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर जीएसटी विभागाच्या कोठडीत असलेले आरोपी फैजल अब्दूल गफार मेवावला आणि मोहोमद अजिज यांनी 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून सध्या जवळपास 500 कोटींची बनावट बिले केली होती. त्यामुळे या दोघांची चौकशी सुरू आहे. जीएसटी घोटाळ्याची व्याप्ती सुरूवातीला तब्बल 1 हजार कोटी सांगण्यात आली होती, परंतु आता ती 2 हजार कोटींच्या घरात असल्याची शक्यता आहे. तसेच घोटाळ्यातील पैसा हा टेरर फंडिंगसाठी वापरण्यात आल्याचा संशय जीएसटी विभागाला असल्यामुळे त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा – असे प्रकार सारखे घडणं गंभीर; पुण्यात तरुणीवरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र

- Advertisement -

फरहत इन्टरप्राईडेस या नावानं बनावट बिलाचा प्रकार सुरु होता. आरोपी फैजल आणि अजिज हे सगळे करत होते. याबाबतची माहिती मिळताच त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी 30 आधार कार्ड, पॅन कार्ड, 30 च्यावर सीम कार्डस त्यांच्याकडे आढळून आले. इतकच नव्हे तर त्याच्या लँपटॉपवरून मिळालेल्या प्राथमिक माहितीत त्यांनी 500 कोटींवर बील राज्यात वितरीत केली आहेत. यात अनेक बड्या कंपन्यांचा सहभाग असल्याचेही दिसून आले.

पहिल्यांदाच जीएसटी विभागासह पोलीसांचा संयुक्तिक तपास

छत्रपती संभाजीनगरमध्ये जीएसटी बिलांचा तब्बल 500 कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान याचा तपास करत असताना या घोटाळ्यातील पैसा टेरर फंडिंगसाठी वापरण्यात आल्याचा जीएसटी विभागाला संशय आहे. त्यामुळे विभागाने संयुक्तिक तपास करण्यासाठी पोलिसांना पत्र लिहिले आणि त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच जीएसटी विभागासह पोलीस संयुक्तिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -