Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊतांविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सरकारविरोधात केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सरकारविरोधात केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Case Registered Against MP Sanjay Raut In Pune Due To Challenge Government)

खासदार संजय राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. त्याचवेळी राऊतांनी एक आवाहन केले होते. “राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाचे पालन करू नये”, असे आवाहन केले होते.

- Advertisement -

नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारबद्दल अप्रिय बोलल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात भादंवि 505 (1 )(ब) कलमा अंतर्गत पोलीस प्रति अप्रतिची भावना निर्माण करणे, चिथावणी देणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांना आवाहन करणे चांगलेच भोवले आहे.

नेमके काय म्हणाले होते संजय राऊत?

- Advertisement -

सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकच्या शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. यावेळी ते म्हणाले होते की, सरकार बेकायदेशीर असून पुढील तीन महिन्यात सरकार कोसळणार आहे. त्यामुळे पोलिसांसह इतर अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर सरकारच्या आदेशाचे पालन करु नका. बेकायदेशीर आदेशाचे पालन केले तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील, असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – संजय राऊत यांनी आपल्या उंची एवढेच बोलावे; आशिष शेलारांचा इशारा

- Advertisment -