घरमहाराष्ट्रदरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या कोकणातील गावांना केंद्राचा व राज्य शासनाचा आधार, वाचा...

दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या कोकणातील गावांना केंद्राचा व राज्य शासनाचा आधार, वाचा सविस्तर

Subscribe

कोकणातील वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून एकत्रित असा आराखडा तयार करण्यात आला आहे. तब्बल 10 हजार कोटी रुपयांचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

निसर्गरम्य ठिकाण म्हणून कोकणाची ओळख आहे. पण या कोकणातील अनेक गावांमध्ये पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे कोकणातील वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून एकत्रित असा आराखडा तयार करण्यात आला आहे. तब्बल 10 हजार कोटी रुपयांचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार कोकणातील सुमारे एक हजार 50 गावांवर दरडी कोसळण्याचा धोका आहे. तर पालघरमधील भूकंपग्रस्त गावे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील दरडग्रस्त आणि वादळात सापडणारी गावे अशा गावांसाठी हा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – ‘अहमदनगर’चं आता ‘अहिल्यादेवी होळकर’ असं नामांतर

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या तालुक्यांची भूकंपग्रस्त तालुके म्हणून ओळख आहे. गेल्या तीन वर्षात या भागात 33 भूकंप झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये 103 दरडग्रस्त गावे आहेत. समुद्राच्या उदानाच्या कार्यक्षेत्रातील 62 गावे तर 128 खाडीकिनारी असलेली गावांचाही यात समावेश आहे. तर नदीच्या पुरामध्ये सापडणारी 48 गावे आहेत. या सर्व गावांवर असणारा संभाव्य धोका लक्षात घेता कायमस्वरूपी उपाय योजनांसाठी अडीच हजार कोटींचा आराखडा केला तयार केला गेला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने दरडग्रस्त आणि समुद्रकिनारी उधाणाच्या टप्प्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ले भागातील जवळपास 75 गावे आणि सह्याद्री पट्ट्यातील वैभववाडी ते सावंतवाडी येथील 103 गावे अशा गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

- Advertisement -

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर या पट्ट्यातील समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील जवळपास 109 गावे तसेच सह्याद्री पट्ट्यातील मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लाजा, राजापूर यामधील 503 गावे या नव्याने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात समाविष्ट करण्याचे धोरण आहे. त्यातून या गावांमध्ये विविध उपाय राबवले जाणार आहेत.

या आराखड्यामुळे गेल्या 20 वर्षात कोकणची वादळात सरासरी 2000 कोटींची हानी झाल्याचे नुकसानाच्या आढाव्यातून समोर आले आहे. त्यानंतर समुद्र किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये भूमिगत वीज वाहिन्यांचे नवे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा समाविष्ट आहेत. विशेषतः सह्याद्री पट्ट्यातील दरडग्रस्त गावांचा देखील या आराखड्यात समावेश करण्यात आलेला आहे.

गावांचे टप्पे कोकणातील पाच जिल्ह्यांमधील नदी किनाऱ्यावरील गावे, खाडी किनाऱ्यावरील गावे, समुद्राच्या उधाणाच्या पट्ट्यातील गावे तसेच सह्याद्री पट्ट्यातील दरडग्रस्त गावे अशा प्रकारे करण्यात आले आहेत. कोकणच्या पाच जिल्ह्यातील दीड हजार गावे इक्वसेंसिटिव्ह झोनमध्ये घेण्यात आली असून त्यात बहुतांशी गावे ही दरडग्रस्त म्हणून ओळखले जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -