घरक्राइमअश्लिल व्हिडिओच्या भितीने तरुणीची आत्महत्या, कल्याणमधील घटनेची चाकणकरांनी घेतली दखल

अश्लिल व्हिडिओच्या भितीने तरुणीची आत्महत्या, कल्याणमधील घटनेची चाकणकरांनी घेतली दखल

Subscribe

उच्चभ्रू वस्तीतील तरुणांनी या तरुणीला अश्लिल चित्रफित पाठवून ब्लॅकमेल केले होते. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची बाब उघड झाली आहे.

महाविद्यालयीन तरुणीने राहत्या इमारतीच्या गच्चीतून आत्महत्या केल्याची घटना काल कल्याण येथून समोर आली होती. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं असून याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. दरम्यान, उच्चभ्रू वस्तीतील तरुणांनी या तरुणीला अश्लिल चित्रफित पाठवून ब्लॅकमेल केले होते. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची बाब उघड झाली आहे. (Chakankar took note of the incident in Kalyan, the suicide of a young woman due to fear of pornographic videos)

हेही वाचा – ७ महिन्यांच्या मुलीला सोडून पळाली माता; पोलिसांकडून एक तासात शोध

- Advertisement -

या आत्महत्या प्रकरणात विकासकांच्या दोन मुलांचा समावेश असून याप्रकरणी सात तरुणांसह एका तरुणीला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी तरूणांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी दृष्टीने पोलिसांनी तपास करावा. या प्रकरणात पीडित कुटुंबावर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. याप्रकरणाचा सविस्तर अहवाल राज्य महिला आयोगाकडे पाठवून देण्यात यावा, असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कोळसेवाडी पोलिसांना दिले आहेत.

पीडिताच्या कुटुंबियांनी केली संरक्षणाची मागणी

- Advertisement -

या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावं, अशी मागणी मृत मुलीच्या पीडित कुटुंबियांनी केली आहे. आरोप उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. आम्ही सामान्य आहोत. त्यामुळे आमच्या जीवाला त्यांच्याकडे धोका आहे. म्हणून आम्हाला संरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -