आव्हान देणाऱ्या बृजभूषण यांनी पुण्यात येताच मानले राज ठाकरेंचे आभार

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान देणारे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुण्यात येताच ठाकरेंचे आभार मानले आहेत. तसंच, राज ठाकरेंशी आपलं वैयक्तिक वैर नसल्याचंही ते म्हणाले.

५ जून रोजी राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली होती. परंतु काही वर्षांपूर्वी ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकेबद्दल माफी मागावी, अन्यथा उत्तर प्रदेशात पाय ठेवून देणार नाही, असं आव्हान बृजभूषण सिंह यांनी दिलं होतं. त्यावेळी राज ठाकरेंनी हा दौरा रद्द केला होता. राज ठाकरेंनी प्रकृतीचं कारण देत कार्यकर्त्यांची सुरक्षा धोक्यात येईल असं सांगत हा दौरा रद्द केला होता. परंतु त्यावेळी काही मनसेचे पदाधिकारी हे अयोध्येत जाऊन आले होते.

हेही वाचा – बृजभूषण सिंहांच्या पुणे दौऱ्याला मनसेचा विरोध नाही; वसंत मोरेंचं स्पष्टीकरण

राज ठाकरेंना आव्हान देणारेच हेच खासदार बृदभूषण सिंह महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आज पुण्यात आले आहेत. त्यामुळे मनसेकडून त्यांचा विरोध होण्याची शक्यता होती. मात्र, मनसेने त्यांचा कोणताही विरोध केला नाही. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विरोध न केल्याबद्दल बृजभूषण यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच, राज ठाकरे मंचावर आल्यास त्यांना आम्ही निश्चितच भेटू. त्यांच्याशी आमचे वैयक्तिक वैर नाही. त्यामुळे त्यांची चांगली भेट घेऊ, असही सिंह म्हणाले.

हेही वाचा – राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार?, वाद पेटण्याची शक्यता