केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, नागपूर कार्यालयातील सुरक्षेत वाढ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे फोन आले. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या नागपुरातल्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

union minister nitin gadkari point out admistration says file want move until without giving bribe

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे फोन आले. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या नागपुरातल्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (Union Minister Nitin Gadkari Death Threat Over 3 Phone Calls Under The Name Of Don Dawood)

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये हे फोन आले आहेत. शनिवारी सकाळपासून एकूण तीन फोन आले आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही फोन उचलल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव घेण्यात आले आहे. त्यामुळे आता नागपूर कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांच्या कार्यालयात शनिवारी सकाळी 11.29 वाजता पहिला फोन आला. त्यानंतर आणखी दोन फोन आले. एक फोन 11.35 वाजता तर तिसरा फोन हा 12.32 वाजता आला. या तिन्ही फोननंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसही या कार्यालयात दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरूवात केली आहे. दरम्यान, आज संध्याकाळी गडकरी यांचे नागपुरात कार्यक्रम आहेत. तर राष्ट्रीय पातळीवरील रस्ता सुरक्षा मोहिमेची आज सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून उद्योजक आणि राजकीय नेत्यांना धमकीचे फोन करण्याचे प्रकार वाढतच चालले आहे. त्याशिवाय, मुंबई पोलीस आयुक्तालयातही धमकीचे फोन येण्याचे प्रमाण वाढले.

त्याशिवाय, मुंबईतील बीकेसी येथील धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी एका इसमाने दिली. त्याच्या धमकीनंतर या शाळेत आणि आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली. बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरूवात केली. परंतु, काही तासाने स्वत: आरोपीनेच फोन करत प्रसिद्धीसाठी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याचे सांगितले.


हेही वाचा – शिवसेनेबरोबरच काँग्रेसच्या भुसभुशीत जमिनीवर उभा आहे महाविकास आघाडीचा डोलारा!