राज ठाकरेंच्या सभेला ५ लाख लोक आले तरी फरक पडणार नाही – चंद्रकांत खैरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास या सभेत राज ठाकरे यांचं भाषण होणार आहे. परंतु राज्यभरातील राजकीय वातावरण तापल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. राज ठाकरेंच्या सभेला ५ लाख लोक आले तरी फरक पडणार नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.

५ लाख लोक आले तरी फरक पडणार नाही

राज ठाकरे यांच्या सभेवरून चंद्रकांत खैरे यांनी आज पुन्हा मनसेच्या गर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मनसेच्या सभेला लाख काय पाच लाख लोकं आले तरी शिवसेनेला काही फरक पडणार नाही. आमच्या जुन्या मित्रांच्या पाठिंब्याने ही गर्दी जमवली जात आहे. या गर्दीला कुणाची स्पाँसरशिप आहे, हे तुम्ही पत्रकारांनीच शोधून काढा. तेथील लोकांना विचारा, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

ही गर्दी कोणत्या स्वरुपाची आहे, तुम्हीच ठरवा

मनसेच्या सभेत येणारे लोक पैसे घेऊन येणार आहेत, यावर प्रतिक्रिया देताना खैरे म्हणाले की, मला स्वतः वैजापूरहून आणि औरंगाबादच्या ग्रामीण भागातून फोन आले. पाच हजार रुपये घ्या, चहा-नाश्ता करा आणि सभेला उपस्थित रहा. त्यामुळे ही गर्दी कोणत्या स्वरुपाची आहे, तुम्हीच ठरवा, असे खैरे म्हणाले.


हेही वाचा : राज्यपालांच्या चहापानाकडे मुख्यमंत्र्यांची पाठ