घरताज्या घडामोडीराज्यपालांच्या चहापानाकडे मुख्यमंत्र्यांची पाठ

राज्यपालांच्या चहापानाकडे मुख्यमंत्र्यांची पाठ

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला भेट दिली. मात्र त्यांनी राज्यपालांसह चहापानाच्या कार्यक्रमाला जाणं मात्र टाळलं.

१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सकाळपासून राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हुतात्मा स्मारकाला भेट देत पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला भेट दिली. मात्र त्यांनी राज्यपालांसह चहापानाच्या कार्यक्रमाला जाणं मात्र टाळलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ऐवजी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

संयुक्त महाराष्ट्र स्मृति दालनाचे नूतनीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. त्यानुसार झालेल्या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. आज पाहणी केल्यानंतर या प्रदर्शनाबाबत सर्वसामान्यांना तसेच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यादृष्टीने येथे लेझर शोच्या माध्यमातून माहिती दिली जावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख आदी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर (पश्चिम) येथे २०१० मध्ये निर्मित संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला ३० एप्रिल २०२२ रोजी एक तप पूर्ण झाले आहे. २८०० चौरस फूट क्षेत्रफळावरील हे विस्तीर्ण तीन मजली दालन म्हणजे संग्रहालय व कलादालन यांचा संगम आहे. येथे इतिहासावर आधारित फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी यावेळी मान्यवरांना दालनातील प्रदर्शनाच्या कामाबाबत माहिती दिली.

- Advertisement -

हेही वाचा – LPG Cylinder Price: एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -