‘ममतांची पाठ वळली की काँग्रेसच्या सुरात सुर’ यालाच डबल ढोलकी म्हणतात, चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर निशाणा

chandrakant patil slams shivsena mp sanjay raut on his allegation over bjp leader
बदनामी करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खुर्ची खाली करायची आहे का? चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सवाल

शिवसेना खासदार दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेत आहेत. मंगळवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गाधी यांची भेट घेणार आहेत. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पाठ वळल्यावर पुन्हा काँग्रेसशी जवळीक करणे याला डबल ढोलकी म्हणतात असा खोचक टोला पाटील यांनी राऊतांवर लगावला आहे. नार्वेकरांनी केलेल ट्विट हे महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावणारे असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये कोणताही नगरसेवक नाराज नसल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांना संजय राऊत युपीएमध्ये जातील का? संजय राऊतांच्या काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारला होता. यावर पाटील म्हणाले की, याला डबल ढोलकी असे म्हणतात, ममता बॅनर्जी आले की, त्यांच्या सुरात सुर मिसळायचा आणि ममता बॅनर्जी यांची पाठ वळली की काँग्रेसच्या सुरात सुर मिसळायचा यालाच डबल ढोलकी म्हणतात. सामन्य माणूस सुद्धा याला डबल भूमिका कधी घेत नाहीत असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना लगावला आहे.

नार्वेकरांवर चंद्रकांत पाटलांचा निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी पतानातील आठवणी जागवल्या आहेत. राम मंदिर उभारण्यासाठी ज्या शिवसैनिकांनी बलिदान दिलं त्यांना कोटी कोटी नमन असे नार्वेकर यांनी ट्विट केलं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नार्वेकरांनी हे ट्विट करणं हे महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावणं आहे. महाविकास आघाडी धर्मनिरपेक्ष यावरच आहे ना? अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन यावर तो मिनार उभा आहे. त्यांचे मातोश्रीच भांडण झालं आहे का कळत नाही. कारण असं ट्विट करणं त्यांच्या पायाला सुरुंग लावण्यासारखे असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.


हेही वाचा : सावरकरांचा दृष्टीकोन वैज्ञानिक होता, शरद पवार यांचे मोठं वक्तव्य