Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी पंकजा मुंडे बंडाचा विचार कधीच करणार नाहीत, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

पंकजा मुंडे बंडाचा विचार कधीच करणार नाहीत, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

एखादी गोष्ट घडली आणि ती आवडली नसल्यास कार्यकर्त्यांना आपली भावना व्यक्त करण्याचा अधिकार

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळालं नसल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मंगळवारी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नाराज नसल्याचे म्हटलं आहे. पंकजा मुंडे कधीच बंड करणार नाहीत अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. कार्यालयातील भाजप दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी रस्त्यावर आणली आहे. भाजपसाठी गोपीनाथ मुंडे यांनी अनेक संघर्ष केले आणि भापला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख दिली. अशा घरात पंकजा मुंडे जन्मल्या आहेत त्यामुळे त्या बंडाचा विचार करणार नाही असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, जर एखादी गोष्ट घडली आणि ती आवडली नसल्यास कार्यकर्त्यांना आपली भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळावं असे कार्यकर्त्यांचे मत होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनेक विचार करुन या मंत्र्यांना निवडले आहे. यामुळे लोकांच्या ध्यानीमनी नव्हतं अशा लोकांना संधी देण्यात आली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

पक्ष नेतृत्वाने सर्वांना जबाबदारी आणि मंत्रिपद शोधून शोधून दिलं आहे. पक्षाचा समतोल राखण्याचा प्रयत्न असतो. कोणाला तरी न्याय मिळताना एकावर अन्याय होतोच. सर्वांना एकसाथ न्याय मिळू शकत नाही. नारायण राणे यांना मंत्रिपद मिळाल तर रणजीत निंबाळकरांना नाही मिळालं, भागवत कराडांना मंत्रिपद मिळालं तर प्रीतम मुंडे यांना नाही मिळालं. केंद्रीय मंत्रिमंडळात २८ जणांना जोडायचं होते त्यात १२ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ४० जणांना घ्यायचे होते यामध्ये आपला देश मोठा आहे यामुळे एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होणारच असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांना भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. परंतु पंकजा मुंडे यांनी त्यांना सांगितले की, कोणीच राजीनामे द्यायचे नाही. आपल्या घरातून आपण निघायचं नाही असे कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. पंकजा मुंडेंवर दुःखाचे डोंगर कोसळले असताना त्यांनी समजदारपणाचे टोक दाखवलं असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -