घरताज्या घडामोडीतुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका, चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांवर पलटवार

तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका, चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांवर पलटवार

Subscribe

भाजपाने सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम पाहावं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला होता. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. तुम्हाला इस्लामपुरच्या बाहेर जागा जिंकता आल्या नाही. तु्म्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर केला आहे. तसेच जयंत पाटील यांच्या सल्ल्याची भाजपला गरज नाही असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली होती. या टीकेचा समाचार चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. भाजपने राजकारण करण्यापेक्षा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करावं असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं होते. याबाबत चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

- Advertisement -

जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही काय करायचं हे ठरवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. तुम्ही तुमचे बघा. तुम्हाला साधे इस्लामबाहेर आणि तुमच्या जिल्ह्याबाहेर जागा मिळवता आली नाही. तुम्ही आता आम्हाला शहाणपणा शिकवू नका असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

हात जोडून विनंती, हे सगळं थांबवा

एखाद्या अधिकाऱ्यावर संशय असेल तर चौकशी करा कारवाई करा, शिक्षा करा पण एखाद्या अधिकाऱ्याच्या मागे एवढे लागणे कारण त्याने आपल्या जावयाला अटक केली म्हणून हे न कळणारे आहे. एकंदरीत समीर वानखेडे प्रकऱण वरवर दिसतं आहे. तेवढ सोप नाही. यासाठी २० ते २५ वर्षांपुर्वीची माहिती काढली पाहिजे. केव्हाचे तरी हिशोब चुकतं करणं चाललय का हे न कळणारे आहे. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे. यंत्रणांना आपले काम करु द्या असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. नवाब मलिकांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे वाटतं तुम्ही जर मंत्रीमंडळात मंत्री आहात तर तुम्ही पत्रकार परिषदच्या माध्यमातून का मागणी करत आहात.

- Advertisement -

हेही वाचा :  राष्ट्रवादीनं सुनिल पाटीलशी संबंधांवर स्पष्टीकरण द्यावे नाहीतर.., आशिष शेलारांचा इशारा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -