घरताज्या घडामोडीशिंदे गटाला विधानसभेच्या ४८ जागा मिळतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं वादग्रस्त वक्तव्य

शिंदे गटाला विधानसभेच्या ४८ जागा मिळतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं वादग्रस्त वक्तव्य

Subscribe

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना भाजप २४० जागा लढवणार तर शिंदे गटाकडे ५० हून अधिक जागा लढवण्यासाठी नेते नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. नेत्यांच्या नाराजीनंतर त्यांनी सारवासारव केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिंदे गट आणि भाजप सोबत लढणार आहेत.

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पक्षाच्या नेत्यांना निवडणुकीच्या दृष्टीने काम करण्याचे आवाहन करत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी बावनकुळेंनी शिंदे गटावर केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गटातील नेत्यांनी भाजपच्या नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली. जागा वाटपाबाबत चर्चा झाली नसताना असे वक्तव्य केल्यामुळे ही चर्चा पक्षश्रेष्ठींपर्यंत गेली आहे.

- Advertisement -

भाजपकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात जोरदार काम करण्यात येत आहेत. कार्यशाळा, पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेण्यात येत आहे. मतदारसंघ मजबूत करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. भाजपने २४० जागांवर लढण्याचे नियोजन केले आहे. तर उरलेल्या ४८ जागा शिंदेंकडे जाण्याची शक्यता आहे. सध्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली नसताना बावनकुळेंनी वक्तव्य केलं आहे. पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देताना बावनकुळेंनी गणित मांडले. यामध्ये ते म्हणाले की, शिंदे गटाकडे ५० पेक्षा नेते नसल्यामुळे त्यांना अधिक जागा जाणार नाहीत. यामुळे शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे.

निवडणुकीच्या जागा वाटपाचा कोणताही फार्मूला ठरला नसताना बावनकुळेंनी असं वक्तव्य केलंय. यामुळे शिवसेना-भाजप युतीमध्ये नाराजी पसरली आहे. बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना उठसूठ बोलू नये अशी तंबी दिली आहे. परंतु त्यांच्या वक्तव्यामुळेच युतीत नाराजी पसरली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : रामदास कदमांकडून उद्धव ठाकरेंची अफजल खानशी तुलना, म्हणाले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -