घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र"छगन भुजबाळांनी आर.पी.आय पक्षात याव" रामदास आठवले यांची खुली ऑफर

“छगन भुजबाळांनी आर.पी.आय पक्षात याव” रामदास आठवले यांची खुली ऑफर

Subscribe

नाशिक : मागील आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सवपक्षाला घरचा आहेत देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी ओबीसी घटकातील व्यक्तीला द्यावी. मागील काही वर्षात सातत्याने मराठा समाजाला पक्षातील तसेच सत्तेतील महत्वपूर्ण पदे देण्यात येत असल्याने पक्षाची प्रतिमा मराठा पार्टी झाली असल्याचे म्हंटले होते. भुजबळ यांच्या या वक्तव्या बाबत बोलताना केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी भुजबळांना थेट त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.

छगन भुजबळ यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष ओबीसी समाजाचा असावा या मागणी नंतर त्याबाबत राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भुजबाळांच्या मागणीचा धागा पकडत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, नाशिक दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही याबाबत आपले मत व्यक्त करताना म्हणले आहे की, छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षात मराठा समाजाला जास्त स्थान दिल जातंय अशी जि भूमिका मांडली आहे ती रास्त आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे पदाधिकारी आहेत.

- Advertisement -

भुजबळ पवारांच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले 

यावेळी बोलताना आठवले पुढे म्हणाले, छगन भुजबळ हे लढवय्या नेते आहेत. आधी ते शिवसेनेत होते तिथेही त्यांनी चांगले काम केले. त्यानंतर ते कॉंग्रेस पक्षात आले. ज्यावेळी महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षात फुट पडली त्यावेळी सर्वप्रथम छगन भुजबळ हेच शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे आणि ताकदीने उभे राहिले होते. त्यामुळे त्यांची मागणी रास्त आहे.

अन्याय होत असेल तर आमच्याकडे या 

छगन भुजबळ लढवय्या नेतृत्व आहे. त्यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अन्याय होत असेल तर त्यांनी त्या पक्षातून बाहेर पडावे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये याव असे माझे त्यांना निमंत्रण आहे. असे म्हणत रामदास आठवले यांनी भुजबळांना थेट खुली ऑफरच देऊन टाकली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -