घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरChhatrapati Sambhaji Nagar: धक्कादायक; लिफ्टमध्ये अडकून 14 वर्षीय मुलाचं शीर धडावेगळे

Chhatrapati Sambhaji Nagar: धक्कादायक; लिफ्टमध्ये अडकून 14 वर्षीय मुलाचं शीर धडावेगळे

Subscribe

छत्रपती संभाजीनगर शहरातील कटकट गेट परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. हॉस्पीटलच्या परिसरात राहत असलेल्या 14 वर्षीय मुलाचं लिफ्टमध्ये डोकं अडकलं आणि त्याचा मृत्यू झाला आहे. नववीत शिकणाऱ्या या मुलाचे आई-वडिल हैदराबादला गेल्याने तो घरी एकटाच होता. तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना त्यानं लिफ्टबाहेर डोकं काढलं. लगेचच लिफ्ट सुरु होताच त्याचं शीर धडापासून वेगळं झालं.

छत्रपती संभाजीनगर शहरातील कटकट गेट परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. हॉस्पीटलच्या परिसरात राहत असलेल्या 14 वर्षीय मुलाचं लिफ्टमध्ये डोकं अडकलं आणि त्याचा मृत्यू झाला आहे. नववीत शिकणाऱ्या या मुलाचे आई-वडिल हैदराबादला गेल्याने तो घरी एकटाच होता. तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना त्यानं लिफ्टबाहेर डोकं काढलं. लगेचच लिफ्ट सुरु होताच त्याचं शीर धडापासून वेगळं झालं. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. साकिब इरफान सिद्दीकी वय (14 वर्षे ),असं या मृत मुलाचं नाव होतं.( Chhatrapati Sambhaji Nagar Shocking A 14 year old boy s head was severed after being stuck in an elevator )

साकीबच्या वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. व्यावसायानिमित्त त्याचे आई-वडिल नुकतेच हैदराबादला गेले होते. त्यामुळे साकिबचा सांभाळ करण्यासाठी त्याला कटकट गेट बागातली हयात हॉस्पिटलजवळील इमारतीत राहणाऱ्या आजी-आजोबांकडे ठेवलं होतं. रविवारी रात्री साडेनऊ वाजता साकीब तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना तो लिफ्टमध्ये गेला. त्यातच खेळता-खेळता लिफ्ट सुरु केली. परंतु, दरवाजा बंद झाला आणि बाहेर पडताना त्याचा गळाच दरवाजात अडकला गेला. घटनेनंतर जोरात आवाज झाला. रक्ताच्या अक्षरश: धारा उडाल्या. इमारतीतील सर्व रहिवाशांनी तिसऱ्या मजल्यावर धाव घेतली. जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात पाठवण्यात आला आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: अकोल्यानंतर नगरमध्ये भडका; शेवगावात दगडफेक, जाळपोळ; 4 पोलीस जखमी )

घटनेनं व्यक्त होतेय हळहळ

इरफान सिद्दीकी हे ट्रॅव्हल्स कार्यालयात काम करतात आणि त्यांना साकिब एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे साकिब घरात सर्वांचाच लाडका होता. तसचं, आई-वडील बाहेर गेल्यास तो आजी-आजोबांकडे राहत असल्यानं, इरफान आणि त्यांच्या पत्नी त्याला सो़डून हैदराबादला गेले होते. मात्र, लिफ्टमध्ये अडकून साकिबचं दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याच्या आई- वडिलांना धक्का बसला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इमारत दहा वर्षे जुनी आहे. त्यातील लिफ्टला सेन्सर नसून ती मॅन्युअल होती. परिणामी साकीबने बाहेर पाहण्याचा प्रयत्न करत असताना दरवाजा समोर आला. दोन बहिणींच्या पाठीवर साकीब हा एकुलता एक भाऊ होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -