Chipi Airport: चिपीची गोपिनाथ मुंडे, प्रफुल्ल पटेलांच्या मदतीची आठवण राणेंकडून शेअर

gopinath-munde-narayan-rane-prafulla patel

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंशी वैर नसल्याचे आज शुक्रवारी चिपी उद्घाटनाच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पण चिपी विमानतळाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजकीय नेत्यांमध्ये कोणी कशी मदत केली याचाही दाखला दिला. चिपी विमानतळाच्या निमित्ताने कोणत्या नेत्याने कशी मदत केली, ही आठवण सांगायलाही नारायणे राणे विसरले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील हजेरीच्या निमित्ताने नारायण राणे यांनी एक आठवण बोलून दाखवली आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले एअरपोर्ट दिला…

मी राज्यात महसूल मंत्री असताना केंद्रात प्रफुल्ल पटेल नागरी हवाई उड्डाण मंत्री होते. प्रफुल्ल पटेल यांनी ग्रीनफिल्ड विमानतळ देशात बनवणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर मी प्रफुल्ल पटेल यांना दिल्लीला येऊन भेटायचे आहे, असा फोन केला. त्यांनी मला भेटीचे कारण विचारले, पण मी भेटायचेच आहे असे सांगितले. मी दिल्ली गाठली आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ग्रीनफिल्ड विमानतळाची मागणी केली. या मागणीवर प्रफुल्ल पटेल म्हणाले, राणे एअरपोर्ट तुम्हाला दिला. पण, हा एअरपोर्ट मंजुर करतानाच त्यांनी एक अट घातली. प्रफुल्ल पटेल यांचा मतदारसंघात असलेल्या काही कामांची त्यांनी मला आठवण करून दिली. महसूलची ही दोन ते तीन कामे मला करून द्या, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. या तडजोडीवरच आज चिपी विमानतळ झाले, अशी आठवण त्यांनी सांगितले.

मुंडे म्हणाले नारायणराव घ्या…

महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा हा दरिद्री जिल्हा म्हणून ओळख होती. पण या जिल्ह्याची ओळख ही पर्यटनासाठी करायचा निश्चय मी केला होता. त्यामुळेच सिंधुदुर्गला दरिद्री जिल्हा म्हणून नका असे आवाहन मी केले होते. सातत्याने पाठपुरावा केल्यानेच सिंधुदुर्गातील पर्यटनाची क्षमता पाहता या जिल्ह्याला पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळख मिळाली. महाराष्ट्रात १९९५ ला दिल्लीत युतीचे राज्य होते. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री तर गोपिनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री म्हणून हजर होते. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून जाहीर झाला. पर्यटनासाठी पर्यटक आले, तर ते कोणत्या जिल्ह्यातून येणार ? त्यांच्या आवडीनिवडी काय ? त्यांना रहायला कशा जागा लागतात ? काय कपडे लागतात, काय खातात ? आहाराचे प्रकार, हॉटेल कोणते लागते याचा अहवाल टाटा कंपनीने ४८१ पानांचा अहवाल तयार केला. स्वच्छतेच, पाहुणचाराचे मार्गदर्शन आम्ही हॉटेल मालकांना केले. पण त्याचवेळी इन्फ्रास्ट्रक्चर चांगले लागणार हे त्यावेळी जाणवत होते. गोपिनाथ मुंडे त्यावेळी उपमुख्यमंत्री होते. सिंधुदुर्गासाठी प्लॅन तयार करत असताना मी त्यांना सांगितले की रस्त्यासाठी ११० कोटी घेतोय, त्यावर मुंडे म्हणाले नारायणराव घेऊन टाका. मुख्यमंत्री असताना एकाचवेळी ११० कोटी रूपये घेऊन एकुण २८ ब्रिज आणि रस्ते एकाचवेळी केले. त्यामुळे एकाचवेळी दोन तालुक्यांना जोडणारे ब्रिज झाले. देवगड – कणकवली, कणकवली – मालवण अशी कनेक्टिव्हिटी निर्माण झाली.


हेही वाचा – चिपी उद्घाटनाला पाहुणे म्हणून येताय… श्रेयावरून राणेंचा ठाकरे सरकारला टोला