घरताज्या घडामोडीनाना पटोलेंचा रोमान्स इन चेरापुंजी, चित्रा वाघ यांच्याकडून व्हिडीओ ट्वीट

नाना पटोलेंचा रोमान्स इन चेरापुंजी, चित्रा वाघ यांच्याकडून व्हिडीओ ट्वीट

Subscribe

व्हिडिओ पोस्ट करून काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं, अशी कॅप्शन चित्रा वाघ यांनी दिली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ भाजपने मॉर्फ केला असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निशाण्यावर घेतलं आहे. त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट करून नाना पटोलेंना डिवचलं आहे. व्हिडिओ पोस्ट करून काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं, अशी कॅप्शन चित्रा वाघ यांनी दिली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ भाजपने मॉर्फ केला असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. (Chitra Wagh shared a nana patole’s viral video)

चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये नाना पटोले एका बाईसोबत बसले असल्याचा दावा वाघ यांनी केलाय. हा व्हिडिओ मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील असल्याचं समोर आलं आहे. नाना पटोले एका महिलेसोबत तिच्या गळ्यात हात टाकून बसले असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. तसंच, त्यांचा टी-शर्टमधील इनफॉर्मल फोटोही या व्हिडिओमध्ये टाकण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच, यावरून चित्रा वाघ यांनाही ट्रोल करण्यात आलं असून याविरोधात नाना न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

काम करणाऱ्याला बदनाम करणे, ही भाजपची रणनीती आहे. त्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. चित्रा वाघ यांच्याविषयी मी काहीही बोलणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

याप्रकरणी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांना प्रश्नही विचारले आहे. त्या म्हणाल्या की, “नाना पटोले यांचा समोर आलेला व्हिडीओ धक्कादायक आहे. सोलापूर, रायगड, नाना पटोले असूदे किंवा कोणताही पक्ष असूदे ज्यावेळी तुम्ही लोकप्रतिनिधी असता तेव्हा तुमची जबाबदारी कित्येकपटीने वाढलेली असते. सर्वांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. यातून लोकप्रतिनिधींकडून लोकांनी काय बोध घ्याला?

“कुणाच्या खासगी आयुष्यात डोकावणं चुकीचंच आहे. पण ती गोष्ट जेव्हा लोकांमध्ये येते, सार्वजनिक होते त्यावेळी ती खासगी राहत नाही. आज सकाळपासून तो व्हिडीओ व्हायरल झाला नंतर माझ्याकडे आला. म्हणून मी नानांना विचारलं की नाना तुम्हीपण?”,असंही चित्रा वाघ पुढे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, “राजकारणात आज ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याबद्दल आम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तो व्हिडीओ माझ्याकडे आल्यानंतर मी सुद्धा नाना पटोले यांना विचारलं की नक्की काय आहे? त्यांच्याकडून याबाबत काही स्पष्टीकरण आलेलं नाही.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -