राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेंवर बाण, व्यंगचित्रातून साधला निशाणा

those who left hindutva left ideology for power they are calling us traitors eknath shinde

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एका ज्योतिषाला भेट दिली होती. यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे.’माझं काय होईल’ … ‘यांचं भविष्य माझ्या हाती’ अशा आशयाचे हे व्यंगचित्र आहे.

हेही वाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगावी भविष्य जाणल्याची चर्चा अन् अंनिसची नाराजी

नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘हात’ दाखवायला ज्योतिषाकडे गेल्याचे माध्यमातून समजले. त्याच गोष्टीचा धागा पकडत क्लाईड क्रास्टो यांनी ज्योतिषाकडे नाही तर फडणवीसांच्या हातात तुमचे भविष्य आहे असे सूचवले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘माझं काय होईल’ असे फडणवीस यांना हात दाखवत विचारत आहेत आणि देवेंद्र फडणवीस ‘यांचं भविष्य माझ्या हाती’ असे बोलत असल्याचे हे व्यंगचित्र क्लाईड क्रास्टो यांनी काढत एकनाथ शिंदे यांना एकप्रकारे तुमचं सरकार अंधश्रध्देवर किती काळ टिकणार हे सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी भविष्य बघितल्याची चर्चा असलेले ‘कॅप्टन खरात’ नेमके कोण?