Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र जगातील मजबूत सैन्यांमध्ये भारतीय सैन्य आणि देशाचा समावेश - मुख्यमंत्री

जगातील मजबूत सैन्यांमध्ये भारतीय सैन्य आणि देशाचा समावेश – मुख्यमंत्री

Subscribe

जगातील मजबूत सैन्य आणि देशापैकी भारत एक देश असल्याचे सैन्याने सिद्ध केले असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेले चोख प्रत्युत्तर ही अभिमानाची बाब आहे. सैन्य आणि वायू दलाने पाकव्याप्त काश्मिरमधील जैश- ए- मोहम्मदच्या तळांवर बॉम्बींग (air strike) करून ते नेस्तनाबुत केले आहे. जगातील मजबूत सैन्य आणि देशापैकी भारत एक देश असल्याचे सैन्याने सिद्ध केले. या यशस्वी कामगिरीकरिता महाराष्ट्राच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य आणि वायू दलाचे अभिनंदन केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्य आणि वायुदलाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते .या ठरावास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

मुख्यमंत्री म्हणाले,”भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात दहशतवादांच्या तळावर केलेली कारवाई ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. पुलवामा येथील हल्ल्यात शहिदांचे बलीदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी केंद्र शासनाने सैन्यास संपूर्ण अधिकार दिले होते. भारत हा कमजोर नसून, जगातील मजबूत सैन्य आणि देशांमध्ये भारत हा एक देश आहे. भारतीय म्हणून ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे.” यावेळी त्यांनी सैन्य आणि वायू दलाचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -