घरमहाराष्ट्र'गिरीश महाजनांनी सेल्फी काढला नाही, उलट त्यांच्यामुळे लोकांना दिलासा मिळाला'

‘गिरीश महाजनांनी सेल्फी काढला नाही, उलट त्यांच्यामुळे लोकांना दिलासा मिळाला’

Subscribe

शुक्रवारी गिरीश महाजन यांनी सांगलीतील पूरपरिस्थीतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी गिरीश महाजन यांना अक्षरक्ष: धारेवर धरले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी महाजनांचे कौतुक केले.

‘गिरीश महाजनांनी सेल्फी काढला नाही, उलट त्यांच्यामुळे पुरग्रस्त लोकांना दिलासा मिळाला’, असे बोलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची पाठराखन केली. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर भागात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कित्येक गावांमध्ये आणि घराघरांमध्ये पाणी शिरले आहे. लाखो लोक पुरामध्ये अडकले होते. त्यांना बाहेर काढण्याचे काम अजूनही एनडीआरएफच्या जवानांकडून सुरु आहे. शुक्रवारी गिरीश महाजन यांनी सांगलीतील पूरपरिस्थीतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी गिरीश महाजन यांना अक्षरक्ष: धारेवर धरले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी महाजनांचे कौतुक केले. ‘गिरीश महाजन प्रत्यक्षात पाण्यात उतरले. उलट त्यांच्या जाण्यामुळे तिथे अडकलेल्या लोकांना आपल्याकडे कुणीतरी आले’, असा दिलासा मिळाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगलीतील पूरस्थितीचा आढावा घेतला. यासाठी त्यांनी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त ठिकाणाला भेट दिली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचा दौरा केला होता. मात्र सांगलीतील परिस्थितीमुळे त्यांना येथे येण्यास परवानगी नाकारली होती. त्यामुळे आज त्यांनी सांगलीत दौरा केला आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली.

कडधान्यांवर जाहिरातबाजीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय?

पूरग्रस्त लोकांना गहू आणि तांदूळ सरकारकडून मदत म्हणून देण्यात आले आहे. मात्र, त्या कडधान्यांवर राज्य सरकारकडून जाहीरातबाजी करण्यात आल्याचे निर्दशनास आले आहे. यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘मला असं वाटतं कुणीही कुणाचे फोटो लावू नये. लोकांना मदत केली पाहिजे आणि ते आपले कर्तव्य आहे.’

- Advertisement -

कर्नाटक सरकारकडून आपल्याला योग्य प्रतिसाद – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘पहिल्या दिवसापासून अलमाटी संदर्भात कर्नाटक सरकारशी आपलं बोलणं चाललेलं आहे. आणि कर्नाटक सरकारचं सहकार्यही आपल्याला मिळत आहे. आपण लक्षात घ्यायला पाहिजे की, मला स्वत: येडीयुरप्पा असं म्हणाले की, ४ लाख क्यूसेकच्या वर जेव्हा पाण्याचा विसर्ग सुरु होतो, तेव्हा त्यांची १२९ गावे ही हळूहळू पुराच्या सावटात येतात. त्यांच्याकडेही बरीचशी पुरपरिस्थिती आहे. तरीही ५ लाख ३० हजारांपर्यंत त्यांनी विसर्ग नेला. सातत्याने ५० हजार क्यूसेकचा फरक राहील हा प्रयत्न आपण त्याठिकाणी केला. आपला त्या ठिकाणी जाणारा जो येवा आहे तो २ लाख ८० हजारांचा होता. तो आपण ३ लाख ३० हजारांचा केला. येवा ३ लाख ८० हजारांचा तो ३ लाख ३० हजारांचा केला. असं करत करत आतापर्यंत ५ लाख ३० हजारापर्यंत हा विसर्ग तिकडे नेला आहे. त्यामुळे कर्नाटकची मदत नाही, असे बिलकूल नाही. आपण जितक्या वेळा विनंती केली आहे, ती त्यांनी ऐकली आहे. पण शेवटी त्यांच्याही गावांमध्ये पाणी शिरत आहे. त्यामुळे दोन्ही राज्य एकमेकांना मदत करत आहेत.’

पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांची इतर मुद्दे:

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांमध्ये जो प्रचंड पाऊस पडला आणि त्यामुळे विशेषता सांगली, कोल्हापूर आणि कराड भागामध्ये जी पूरपरिस्थिती निर्माण झाली. गेल्या दोन दिवसांपूर्वी मी कोल्हापूरला येऊन गेलो. त्यावेळी हेलिकॉप्टरवरुन सांगलीला उतरण्याची परवानगी मिळाली नाही. म्हणून मी त्यादिवशी सांगलीला येऊ शकलो नाही. म्हणून मी आज सांगलीमध्ये येऊन सांगलीमधील परिस्थितीची पाहणी आणि विशेषता आढावा बैठक घेतली.’ यापुढे ते म्हणाले की, ‘साधारण आपण बघितलं तर यावेळचा पाऊस भयानक आहे. २००५ साली जो पूर आला होता त्यावेळी आपण सांगलीचा विचार केला तर ३१ दिवसांमध्ये सांगली २१७ टक्के पाऊस पडला होता आणि २०१९ मध्ये ९ दिवसांमध्ये ७५८ टक्के पाऊस पडला आहे, म्हणजे जो ३१ दिवसांमध्ये पडला होता त्यापेक्षा तीनपट पाऊस हा केवळ ९ दिवसांमध्ये पडला. तसच कोल्हापूरचा विचार आपण केला तर ३१ दिवसांत कोल्हापूरमध्ये १५९ टक्के पाऊस पडला होता तर २०१९ मध्ये ९ दिवसांत ४८० टक्के म्हणजे तिप्पट पाऊस पडला. विशषत: कोयनामध्ये ९ दिवसांत ५० टीएमसी पाणी भरेल इतका पाऊस पडला. त्यामुळे कोयना, कृष्णा नद्यांमधून विसर्ग झाला. त्याचबरोबर कोल्हापूरला पंचगंगा नदीचा विसर्ग झाला. अशा सर्व एकत्रित विसर्गामुळे अभूतपूर्व असा पूर आला. साधारणपणे सुरवातीच्या दोन ते तीन दिवसांमध्ये रिलिफ ऑपरेशन सुरु असताना पाणी तेवढं वाढत नव्हतं. पण ते अचानक फार वेगानं वाढलं. म्हणून बचाव कार्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरुन टिम्स आपण मागवल्या. उडीसा, पंजाब, गुजरात, गोवा मधून टीम्स बोलावल्या. आज विशाखापट्टणमहून नौदलाची एक टीम बोलावली आहे. बचावकार्यासाठी या भागात एकूण ९५ बोटी कार्यरत आहेत. सांगली जिल्ह्यात एकूण विस्थापीत कुटुंब हे १०१ गावांमधून २८५३७ कुटुंब म्हणजे ३ लाख ७८ हजार नागरिक विस्थापीत झाले आहेत.’

- Advertisement -

‘पुरात वाहून गेलेल्यांच्या कुटुबियांना ५ लाख मदत’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘पुरात वाहून गेलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याचबरोबर पुरात अपंगत्व आलेल्यांना २ लाख मदत दिले जाणार आणि ज्यांच्यावर उपचार ज्यांवर सुरु आहे त्यांना ४, ८ आणि१२ हजार दिले जाणार आहेत. घर पडलेल्यांना १ लाख दिली जाईल.’ त्याचबरोबर जनावरांच्या बदल्यातही पोस्टमार्टमच्या अटी शिथिल करुन पैशांची मदत दिली जाणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

आता पुढचे नियोजन कसे असणार?

पाणी ओसरत आहे. त्यानंतर तेथील गावांमधील जनजीवन सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारचे नियोजन कसे असेल याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘शंभर डॉक्टर कोल्हापूर आणि सांगलीला असमार आहेत. गोळ्यांची कुठलीही कमतरता भासणार नाही. प्रत्येक गावांमध्ये किमान एक तरी डॉक्टर आणि दोन फार्मानिस्ट आणि इतर सपोर्ट स्टाफ असेल. सर्वात जास्त सफाईवर आपल्याला कारवाई करावी लागेल. त्यामुळे सफाई करता एडीश्नल मॅनपावर देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. आजूबाजूच्या महापालिकेची माणसं आणि मशिनरी दोन्ही उपलब्ध करुन देत आहोत. विशेषता सांगली शहरामध्ये जे सीबीएचे टँक आहेत, ते ओव्हर फ्लो होतील. त्यामुळे ते तात्काळ साफ होणे गरजेचे आहे. इथल्या काही मशिन्स आहेत, आजूबाजूच्या काही मशिन्स आहेत. ते आणून आपण काम करणार आहोत. जेणेकरुन लवकरात लवकर घाण आपल्याला साफ करता येईल. दुकांनामध्ये किंवा घरांमध्ये चीखल आणि जी काही घाण आहे, ती देखील साफ करण्यासाठी आपण आदेश दिले आहेत. आता राज्यभरातल्या जिथल्या जिथल्या टीम्स आपल्याला उपलब्ध होताहेत ते पाणी कमी झाल्यावर येथे उपलब्ध होण्याची व्यवस्था आपण करणार आहोत. यासोबतच शेतीतला गाळ काढण्यासाठी १३ हजार प्रती हेक्टर आपण देतो आहोत. जी जमीन खरडून गेली आहे, त्या जमिनीसाठी देखील ३८ हजार रुपये देतो आहोत. त्याचबरोबर जिथे उद्योगाचे नुकसान झाले आहे त्याही ठिकाणी मदत करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे.’ पाणी पुरवठ्याच्या योजना लवकरात लवकर सुरु करणे आणि वीज पुरवठा पुन्हा सुरु करणे त्यासाठीही आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘मृत जनावरांच्या व्हिलेवाटसाठी प्रयत्न करतोय’

‘ज्या जनावरांचा मृत्यू झाला आहे, त्यांची व्हिलेवाट लावायची आहे. कारण त्यातून वास आणि रोगराई मोठ्या प्रमाणात पसरेल. म्हणून त्याचीही व्यवस्था आपण करतोय. या सर्वांसाठी जो काही निधी लागणार आहे, त्याचीही व्यवस्था आपण करतोय. त्यामुळे निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. मी दोन्हीकडे जिल्हाधिकारी, महानरपालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांना सांगितले आहे की, जो काही निधी लागेल तो निधी नोंदवावा तो राज्य सरकारच्या वतीने आम्ही देऊ’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे मदतीचे आव्हान

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘अनेक लोकं मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत. पिण्याच्या पाण्याची लोक मदत करत आहेत. ड्राय फ्रूट्सचीही लोक मदत करत आहेत. ती मदतही आम्ही स्वीकारत आहोत. फक्त गहू, तांदूळचा मोठा सरकारकडे आहे. त्यामुळे इतर काही कुणी मदत करत असेल तर ती स्वीकारुन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतोय. त्याचबरोबर ज्यांना मदत करायचे आहे त्यांना माझे आवाहन असे आहे की पाणीचे रिहॅब्लिटेशन आपल्याला करायचे आहे. त्याच्यामध्ये ज्याला कुणाला मदत करायची इच्छा आहे ते करु शकता. कारण सरकार तर मदत करेलच. मात्र, गाव दत्तक घेऊन परिस्थिती सुधारण्यास मदत केले तर त्यांना संधी उपलब्ध करुन देऊ. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने मदत केली आहे. त्याचबरोबर शिर्डी ट्रस्टचा मला फोन येऊन गेला आहे. पंढरपूरचे अतुल भोसले यांचा देखील फोन येऊमन गेला. कोल्हापूरचे महालक्ष्मी देवस्थान येथूनही मदतीचा मॅसेज आला आहे. अशा अनेक भागांतून मदतीचे हात पुढे येत आहेत. स्वयंसेवी संस्थाही मदतीसाठी पुढे येत आहेत. सगळ्यांची नावे मला घेता येणार नाही. मात्र लोकांची मदत येत आहे.’ त्याचबरोबर ‘आता पॅनिकची परिस्थीती नाही. धोका टळलेला आहे. दोन दिवस पाण्यामध्ये राहिल्यामुळे साहजिकच भीती वाटणार. लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सर्वांना बाहेरव काढण्याचे सुरु आहे. पण ज्याठिकाणी पाणी कमी झाले आहे. त्याभागामध्ये राहणाऱ्या लोकांची आम्ही व्यवस्था करत आहोत’, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


हेही वाचा – सलग सहाव्या दिवशी महापूराचे थैमान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -