घरमहाराष्ट्रआमदार राणा अन् कडूंच्या वादात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; मुंबईत बोलावली तातडीची बैठक

आमदार राणा अन् कडूंच्या वादात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप; मुंबईत बोलावली तातडीची बैठक

Subscribe

शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि भाजपशी जवळीक असणारे आमदार रवी राणा यांच्यातील वाज विकोपाला पोहचले आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही आमदारांना चर्चेसाठी आज वर्षा बंगल्यावर बोलावले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीमुळे दोघांमधील वाद मिटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांना तातडीने रविवारी मुंबईत येण्यास सांगितले आहे. त्यामुळे रवी राणा आणि बच्चू कडू मुंबईत दाखल झाले आहेत. आता थो़ड्याच वेळात ते मुंबईत वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
(cm eknath shinde called mla bachu kadu and ravi rana to varsha bungalow today for discussion)

दरम्यान दोन्ही आमदार मुंबई दाखल झाले असले तरी त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं आहे. राणा आणि कडूंनी माध्यमांसमोर कोणतीही भूमिका मांडू नये, अशा सूचना सरकारमधील वरिष्ठांनी केल्या आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत दोघांमधील वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

आमदार रवी राणा यांनी खोक्यांबाबत केलेल्या आरोपींनंतर आमदार बच्चू कडू यांनी 28 ऑक्टोबरला नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणांनी केलेले आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बच्चू कडून यांनी राणांच्या पैसे घेतल्याच्या आरोपाविषयी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले नाही तर वेगळा विचार करू, असा इशारा दिला होता.

बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर राजकीय चक्रं फिरायला सुरुवात झाली. यावेळी शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी कडू यांनी सबुरीचा सल्ला दिला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, प्रविण दरेकर आणि उदय सामंत यांनी बच्चू कडू यांनीही त्यांची समजूत काढली आहे. अखेर एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना मुंबईला भेटीसाठी बोलावून घेतले. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि रवी राणा यांच्या आजच्या भेटीत नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

- Advertisement -

एसआरए घोटाळ्यासाठी पेडणेकरांकडून मृत भावाच्या फोटोचा वापर, किरीट सोमय्यांचा कागदपत्रांसहित दावा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -