सुहाना – प्रवीणचे ब्रॅन्ड मेकर हुकमीचंद चोरडिया यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन

मसाले आणि लोणची या उदोगातील ख्यातनाम व्यक्तिमत्तव अशी ओळख असलेले हुकमीचंद यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३० सालात अहमदनगर जिल्यात असलेल्या पारनेर येथे झाला होता. कमलबाई यांच्या जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा ते सोलापुरातही काही काळ वास्तव्यास होते.

सुहाना आणि प्रवीण (suhana and privin spice brand) मसालेवालेचे संस्थापक आणि जेष्ठ उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (hukmichand sukhalala choradia) यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. मसाले आणि लोणची या उद्योगातील ख्यातनाम व्यक्तिमत्तव अशी ओळख असलेले हुकमीचंद यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३० सालात अहमदनगर जिल्यात असलेल्या पारनेर येथे झाला होता. कमलबाई यांच्या जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा ते सोलापुरातही काही काळ वास्तव्यास होते. त्यावेळी त्यांनी ‘आनंद मसाला’ हा घरगुती मसाले तयार करून त्यांची विक्री करण्याचा एक छोटेखानी व्यवसाय सुरु केला होता. त्या नंतर पुणे येथे हडपसर भागात नोकरी करत असतानाच संध्याकाळच्या वेळी घरोघरी जाऊन मसाल्यांची विक्री करण्यास सुरुवात केली.

मसाल्यांची विक्री करण्यापूर्वी हुकमीचंद हे मिरची बियाणे विकण्याचा व्यवसाय करत होते. आणि तो व्यवसाय करता करताच त्यांना मसाला तयार करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर गरम मसाला आई त्या सोबतच कांदा – लसूण मसाला तयार करून घरोघरी त्याची विक्री करण्यास सुरुवात केली. १९६० सालात ‘प्रवीण मसाले’ ( pravin spices) या नावाने त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीची १० वर्ष अत्यंत कष्टाने हडपसर येथे मोठी जागा घेऊन १९७२ मध्ये व्यवसाय विस्तारित केला. १९७६ मध्ये सुमारे ५०० किलो लोणचं तयार करून त्यांनी ‘प्रवीण’ या नावाने बाजारात बाजारात उत्पादने विक्रीसाठी आणली. तत्यांच्या याच वाय्व्सायाचा विस्तार त्यांची चौथी पिढी करीत आहे. भारतात दहा कारखाने आणि विक्रीकेंद्रे उभी करण्यात हुकमीचंद यांचेच कष्ट आहेत. व्यवसाय करताना अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यक्तिगत जीवनात अत्यंत साधं राहणीमान हे त्यांचं मुख्य वैशिष्ट्य होते. त्याचबरोबर सेंद्रिय शेती हा त्यांचा विशेष आवडीचा विषय होता.

मागील २० वर्षांपासून हुकमीचंद हे प्रत्यक्ष व्यवसायात सक्रिय नव्हते पण ते त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येकाला कोणत्याही विषयावर आणि व्यवसायासंबंधित अनेक विषयांवर योग्य ते मार्गदर्शन करत होते. हुकमीचंद यांचा मित्रपरिवार सुद्धा मोठा होता. अनेक शैक्षणिक संस्था, रुग्णालय आणि इतर गरजू व्यक्तींना ते मदत करत असत. त्याचबरोबर सैनिकांसाठी मदतनिधी देण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत होते. हुकमीचंद यांना १९८३ मध्ये लघुउद्योग महासंघाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. १९८४ आणि १९९३ मध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांचा गौरव सुद्धा करण्यात आला होता. १९९२-१९९३ मध्ये आंबा महोत्सवात ‘प्रवीण लोणचे’ (pravin pickle) यांच्या उत्पादनाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

हुकमीचंद यांचं व्यक्तिमत्तव जरी महान असलं तरीही ते नेहमीच प्रसिद्धिपरामुख राहिले. हुकमीचंद चोरडिया यांच्या जीवनाचा आढावा घेणारे ‘बिकट वाट यशाची’ हे मधुबाला राजकुमार चिरडीया लिखित पुस्तक सुद्धा विशेष लक्षणीय ठरले आहे. २०१२ मध्ये ‘सुहाना – प्रवीण मसालेवाले’ (suhana- pravin spices) या उद्योगाला ५० वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्ताने हुकमीचंद आणि कमलबाई यांच्या जीवनावर आधारित ‘मसाला’ हा चित्रपट सुद्धा निर्मित करण्यात आला होता. हुकमीचंद चोरडिया यांचा संपूर्ण जीवनप्रवासच मोठा प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनाने मसाले आणि लोणची यांच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली आहे.