घरमहाराष्ट्रध्वनिक्षेपक लावल्याप्रकरणी धार्मिक स्थळांवर गुन्हा दाखल

ध्वनिक्षेपक लावल्याप्रकरणी धार्मिक स्थळांवर गुन्हा दाखल

Subscribe

हायकोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत धार्मिक स्थळांवर ध्वनिक्षेपक लावल्याप्रकरणी मंदिर, मस्जिद अशा आठ धार्मिक स्थळांच्या प्रमुखांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

हायकोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत धार्मिक स्थळांवर ध्वनिक्षेपक लावल्याप्रकरणी मंदिर, मस्जिद अशा आठ धार्मिक स्थळांच्या प्रमुखांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दिवसाही कोणी लाऊड स्पीकर लावणार असेल तर पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. पोलिसांची परवानगी घेऊनच नेमून दिलेल्या वेळेत दिवसा स्पीकर लावता येईल. या नियमाचे कोणी उल्लंघन करत असेल तर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

विनापरवाना ध्वनिक्षेपक लावल्याने कारवाई

सोलापूरमधील मोमीन नगर, जुना विडी घरकुल येथे मस्जिदीवर विनापरवाना ध्वनिक्षेपक लावल्यामुळे दस्तगीर इमामसाब अत्तार (रा. मोमीननगर) यांच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार शब्बीर तांबोळी यांनी तक्रार दिली असून ही कारवाई झाली. शिवगंगा नगर दोन, नई जिंदगी येथील तोहिद मस्जिदीवर विनापरवाना ध्वनिक्षेपक लावण्यात आला.

- Advertisement -

पोलिसांनी गुन्हा दाखल केला

दस्तगीर अब्दुल रहमान शेख (रा. नई जिंदगी, शिवगंगा नगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार शब्बीर तांबोळी यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे. खाटीक मशीद, कुरेशी गल्ली येथे ध्वनिक्षेपक लावल्यामुळे अन्वर महामूद कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार इम्रान शेख यांनी बझार पोलिसात तक्रार दिली आहे. याशिवाय बागे मदिना या मस्जिदीमध्ये ध्वनिक्षेपक लावल्यामुळे अब्बास अलीस हाजी इस्माईल शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -