घरमहाराष्ट्रवंचित- ठाकरे गट युतीबाबत काँग्रेसचा सावध पवित्रा; 'मागचे अनुभव फार वाईट...'

वंचित- ठाकरे गट युतीबाबत काँग्रेसचा सावध पवित्रा; ‘मागचे अनुभव फार वाईट…’

Subscribe

शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीने आज अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. मात्र  वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. मागील काही अनुभव फार वाईट होते, म्हणून आम्ही ताकही फुंकून पितोय, म्हणत नाना पटोलेंनी काँग्रेसची या युतीवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. शिवशक्ती- भीमशक्ती एकत्र आली त्याला विरोध करण्याचं कारण नाही. त्यांचे स्वागत आहे. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, तर अद्याप प्रकाश आंबेडकरांकडून मविआला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. उद्धव ठाकरेंसोबत त्यांची चर्चा झाली, त्यामुळे प्रस्ताव आल्यानंतर आंबेडकरांचे म्हणणे काय आहे त्यावर चर्चा करु, आमची भूमिका सकारत्मक आहे, विरोधात नाही. भाजपासा थांबवणे हे आमचं काम आहे. लहान मोठ्या सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आमची भूमिका आहे. मात्र मागील काही अनुभव आहेत त्यामुळे ताकही फुंकून पितोय. दोस्तीचा हात पुढे केला तर तो पूर्णच करायची भूमिका काँग्रेसची आहे, म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सावध पवित्रा घेतला आहे.

नाना पटोले या युतीवर बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. प्रकाश आंबेडकरांनी नेमका काय प्रस्तावर दिला हे तुम्ही आम्हाला सांगा असं म्हटलं. त्यानंतरचं या विषयावर पुढे जाऊ, चर्चा झाली परंतु प्रस्ताव नेमका काय यावर बोलणं नाही. मैत्री करायची असेल तर सगळ्या विषयावर स्पष्टता हवी, मीडियाने काय दाखवाने हा त्यांचा प्रश्न आहे. जागावाटपाबाबत प्रस्ताव आल्यावर चर्चा करु, भाजपासा सत्तेतून दूर करणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तेच काम राहुल गांधी करत आहेत. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जायचे आहे. फायदा तोटा हा भाग नाही. सगळ्यांना एकत्रित आणणे हे आमचं धोरण आहे. मागते काही अनुभव फार वाईट आहेत. त्यामुळे स्पष्टता असल्यास पुढे जाता येईल, असंही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवारीबाबतही नाना पटोलेंनी भाष्यकेलं आहे. निवडणूक बिनविरोधात व्हाव्यात ही महाराष्ट्राची परंपरा होती. पण जेव्हा राज्यात सत्तापरिवर्तन झाले. त्यात पंढरपूर ,देगलूर, कोल्हापूर या सगळ्या निवडणुकीचा अनुभव घेतला तेव्हा भाजपने त्याठिकाणी उमेदवार उभे केले होते. कसबा मतदारसंघाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आमच्याकडे भाजपचा प्रस्ताव नाही. इच्छुक उमेदवारांसोबत गाठीभेटी सुरु आहेत. निवडणूक लढवण्याची तयारी आहे. अनेक नेते उच्छुक असून कसबा जागा काँग्रेस लढेल आणि चिंचवड जागा राष्ट्रवादी लढेल असं चित्र आहे. मविआत चर्चा झाली असून काही अडचण नाही. येत्या 2 -3 तारखेला आमची भूमिका समोर येईल, असंही नाना पटोले म्हणाले.


प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत एकूण २३ चित्ररथांचे संचलन, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांचा समावेश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -