घरताज्या घडामोडी२०२४ च्या लोकसभेआधी पुन्हा 'पुलवामा हल्ला'; उदित राज यांचे वादग्रस्त विधान

२०२४ च्या लोकसभेआधी पुन्हा ‘पुलवामा हल्ला’; उदित राज यांचे वादग्रस्त विधान

Subscribe

२०२४ च्या लोकसभेआधी पुन्हा 'पुलवामा हल्ला' होणार, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे नेते उदित राज यांनी केले आहे.

‘२०२४ च्या लोकसभेआधी पुन्हा ‘पुलवामा हल्ला’ होऊ शकतो. त्यामुळे राहुल यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये तथ्य आहे. या हल्ल्याची योग्य चौकशी व्हायला हवी, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे नेते उदित राज यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केले आहे. राहुल गांधी यांच्या पुलवामा हल्ल्याबाबतच्या विधानाचे समर्थन करताना उदित राज यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये हे विधान केले आहे.

काय म्हणाले उदित राज?

‘सोशल मीडियावर राष्ट्रवादाचा प्रचार करणारे बहुतांश लोक हे उच्चवर्णीय समाजाचे असतात. पण ज्या सैनिकांना हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली ते दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय समाजातील आहेत, असे वादग्रस्त ट्विट उदित राज यांनी केले आहे.

- Advertisement -

उदित राज यांच्या या विधानावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्यावरुन केंद्र सरकारला तीन प्रश्न विचारले होते. ‘आज आपण पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची श्रद्धांजली वाहत आहोत. पण, यासोबतच या हल्ल्यामुळे सर्वात जास्त फायदा कुणाला झाला? या हल्ल्यासंदर्भातील चौकशीतून काय समोर आले? सुरक्षेतील उणीवांसाठी मोदी सरकारमधील कुणी याची जबाबदारी घेतली का?’, असे सवाल राहुल यांनी उपस्थित केले होते.

- Advertisement -

भाजप नेत्यांनी राहुल यांच्या ट्विटरवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल यांचे ट्विट अत्यंत दुर्देवी असल्याचे म्हटलं होते. ‘पुलवामा हल्ल्याबाबतचे हे विधान अत्यंत दुर्देवी आहे. गांधी परिवार फायद्याच्या गोष्टींपलीकडे कधीच विचार करणार नाही का? यांची आत्माच भ्रष्ट झाली आहे’, असे संबित पात्रा म्हणाले.


हेही वाचा – हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच – मुख्यमंत्री


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -