घरताज्या घडामोडीLive Update : मेडल्स विसर्जीत न करण्याचा कुस्तीपटूंचा निर्णय

Live Update : मेडल्स विसर्जीत न करण्याचा कुस्तीपटूंचा निर्णय

Subscribe

30/5/2023 18:2:39 मेडल्स विसर्जीत न करण्याचा कुस्तीपटूंचा निर्णय

30/5/2023 16:59:35 हरिद्वारच्या गंगेत कुस्तीपटू आंदोलक पदके विसर्जित करण्यासाठी हजर

- Advertisement -

30/5/2023 15:56:30 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी रात्री 08 वाजता पत्रकार परिषद


30/5/2023 14:31:32 केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देणार. लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा

- Advertisement -

(कृषी विभाग)

कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता. लाखो कामगारांचे हित जपले.

(कामगार विभाग)

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार. पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार

(कृषी विभाग)

“डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन” योजनेस मुदतवाढ. योजना आणखी तीन जिल्ह्यातही राबविणार.

(कृषी विभाग)

सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करणार. २२.१८ कोटी खर्चास मान्यता

(कृषी विभाग)

महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण

(पर्यटन विभाग)

राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता. ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार

(उद्योग विभाग)

कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता. २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार

(वस्त्रोद्योग विभाग)

सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट. अधिनियमात सुधारणा करणार

(सहकार विभाग)

बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळणार. अधिमूल्यात ५० टक्के सवलतीचा निर्णय

(नगरविकास विभाग)

अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत प्राध्यापकांची १०५ पदांची निर्मिती करणार

(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणार. अतिरिक्त १७१० कोटीच्या खर्चास मान्यता

(जलसंपदा विभाग )

30/5/2023 14:25:32 भाजपचे आमदार राम शिंदे यांना एका युवकाकडून धमकी

धमकी देणाऱ्या आरोपीवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


30/5/2023 13:37:59 दिल्लीत 22 वर्षीय तरुणीची चाकूने वार करून हत्या

घराच्या टेरेसवर रक्ताने माखलेला मृतदेह सापडला


30/5/2023 13:24:48 आंदोलक पैलवान गंगेत विसर्जित करणार मेडल


30/5/2023 13:14:54 विरोधकांच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार


30/5/2023 13:4:20 दिवंगत अभिनेते निळु फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले हिचा राष्ट्रवादीत प्रवेश


30/5/2023 12:56:45 मोदी सरकारची नऊ वर्ष सरकारला नाकीनऊ आणणारी – संजय राऊत

सर्व पक्षांना संपवण हे भाजपाचे धोरण – संजय राऊत

30/5/2023 12:22:47 बाळू धानोरकरांच्या निधनाने धक्का – संजय राऊत

बाळू धानोरकर मुळचे शिवसैनिक – संजय राऊत


30/5/2023 10:53:19 बेळगावमध्ये वैमानिकांना प्रशिक्षण देणाऱ्या विमानाला अपघात

रेडबर्ड कंपनीच्या विमानाला अपघात, प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी जखमी


30/5/2023 10:29:33 खास गप्पा मारण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो – देवेंद्र फडणवीस

राजकीय सोडून इतर चर्चा केल्या – देवेंद्र फडणवीस


30/5/2023 10:25:2 शरद पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार

जयंत पाटील, अजित पवार उपस्थित राहणार


30/5/2023 9:20:17 सचिन तेंडूलकर स्वच्छ मुख्य अभियानाचा ‘स्माईल अँबॅसिडर’


30/5/2023 9:13:4 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर


30/5/2023 8:28:32 जम्मू-श्रीनगर महामार्गावर बस दरीत कोसळली, सात ठार, १५ हून अधिक जखमी


30/5/2023 7:22:48
अमृतसरहून कटराला जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी


चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -