घरताज्या घडामोडीमराठा आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका योग्य, भाजपची टीका द्वेशभावनेतून असल्याचा काँग्रेसचा आरोप

मराठा आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका योग्य, भाजपची टीका द्वेशभावनेतून असल्याचा काँग्रेसचा आरोप

Subscribe

भाजपकडून मराठा आरक्षणावर होणारी टीका दुर्दैवी असून द्वेशभावनेतून करण्यात येत आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्याने आणि केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केल्याने राज्य सरकार आणि भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. मराठा आरक्षणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. मराठा आरक्षणावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका योग्यच आहे. केंद्राच्या याचिकेवरुन ते स्पष्ट झाले असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सिन सावंत यांनी म्हटले आहे. भाजप नेत्यांकडून टीका द्वेशभावनेतून करण्यात येत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषदे घेतली यावेळी त्यांनी भाजपवर आरोप करत मराठा आरक्षणावरील सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावरील भाजपच्या टीकांना प्रत्युत्तर दिले आहे. तर भाजपकडून मराठा आरक्षणावर होणारी टीका दुर्दैवी असून द्वेशभावनेतून करण्यात येत आहे. केंद्र सरकारने मराठा आरक्षणावर पुढाकार घेऊन १०२ व्या घटना दुरुस्तीसंदर्भात फेरिवाचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावरुन राज्य सरकारची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने ५० टक्क्यांवरील आरक्षण आणि इंद्रा साहनी खटला निकालावरही भूमिका घ्यावी अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर राज्य सरकारने बाजू योग्य मांडली नाही असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. फडणवीस सरकारच्या काळात महत्त्वाच्या गायकवाड कमिशनची कार्यकक्षाच निश्चित केली नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अहवाल ग्राह्य धरला नाही असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

भाजप मराठा आरक्षणावरील मुद्द्यांवर राज्य सरकारवर टीका करत आहे. परंतु संघाशी संबंधित असलेल्याने मराठा आरक्षणाला विरोध करणारी सेव्ह द मिरीट ही संस्था स्थापन केली आहे. याबाबत भाजपने उत्तर द्यावे अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -