घरताज्या घडामोडीराहुल गांधींवरील बडबड थांबवा, काँग्रेसचा नितेश राणेंना इशारा

राहुल गांधींवरील बडबड थांबवा, काँग्रेसचा नितेश राणेंना इशारा

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन आणि कुख्यात गुंड दाऊदशी करुन भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याएवढी नितेश राणे यांची राजकीय उंची आणि पात्रता नाही. त्यामुळे त्यांनी वाह्यात बडबड थांबवावी अन्यथा त्यांचे वस्त्रहरण त्यांच्याच भाषेत करु, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला.

राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. राहुल गांधी हे सरकारी घरात राहून देशाविरोधात बोलतात अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. या टीकेचा लोंढे यांनी आज समाचार घेतला.

- Advertisement -

नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वाह्यात बडबड केली. त्यावरूनच त्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते. दररोज कोणाला तरी अर्वाच्च शिव्या देण्यापलिकडे राणेंना काही येत नाही. राहुल गांधी हे दिल्लीत सरकारी घरातच राहताच, अंधेरीतील राणेंच्या राजमहालासारख्या अवैध बांधकाम केलेल्या घरात ते राहत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कारण ते गांधी आहेत राणे नाहीत. नेहरु-गांधी परिवाराने देशासाठी केलेला त्याग आणि बलिदान राणेंसारख्या सुमार बुद्धीच्या लोकांना या जन्मीतरी समजणे शक्य नाही, अशी शेलकी टीका लोंढे यांनी केली.

नितेश राणेंनी राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन, माफिया दाऊदशी केली. त्याच राहुलजींच्या हाताखाली नितेश यांचे वडील नारायण राणे यांनी दहा-बारा वर्षे काम केले आहे. त्यामुळे याची त्यांना माहिती नाही का? नसेल तर नितेश यांनी वडिलांना विचारुन घ्यावे. नितेश राणे यांच्या बोलण्याला महत्व देण्याची फारशी गरज नाही. पण त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल विचार करुन बोलावे. अन्यथा आम्हीही तुमच्याच भाषेत उत्तर देऊ. तेव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा मिळणार नाही, असेही अतुल लोंढे यांनी ठणकावून सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांची पुन्हा शिवाजी महाराजांसोबत तुलना, मनसेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसही


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -