Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र कोरोनाचे राज्यात दोन बळी, ६६० रुग्ण; तर मुंबईत २६६ बाधित

कोरोनाचे राज्यात दोन बळी, ६६० रुग्ण; तर मुंबईत २६६ बाधित

Subscribe

मुंबई: मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. शनिवारी मुंबईत कोरोना बाधित २६६ रुग्णांची तर राज्यात एकूण ६६० रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, राज्यात कोरोना बाधित दोन रुग्णांचा बळी गेला आहे.

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आयुक्त इकबाल चहल यांनी, पालिकेच्या रुग्णालयात रुग्ण, डॉक्टर, नर्स, अभ्यागत यांना मास्क घालणे सक्तीचे केले आहे. तसेच, खासगी रुग्णालयातही मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. तर राज्यातही काही जिल्ह्यात मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबई महापालिका व शासकीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विदेशामधून मुंबईसह राज्यात विमानाने येणाऱ्या प्रवाशांवरही बारीक लक्ष दिले जात आहे. त्यांची कडक आरोग्य तपासणी केली जात आहे. शनिवारी विमानतळावर कोरोना बाधित दोन रुग्ण आढळून आल्याने समजते.

तसेच, शनिवारी मुंबईत कोरोना बाधित २६६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ६० हजार ३०९ झाली आहे. मात्र सुदैवाने मुंबईत शनिवारी कोरोना बाधित एकही रुग्ण मृत्युमुखी पडलेला नाही. तर दिवसभरात २०७ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत ११ लाख ३८ हजार ९१४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या १,७०२ सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात शनिवारी कोरोनाचे ६६० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात राज्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८१ लाख ५५ हजार १८९ झाली आहे. तर राज्यात कोरोना बाधित दोन रुग्णांचा बळी गेला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोना बाधित मृत रुग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ४७७ झाली आहे. तर राज्यात ५३९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ८० लाख ६६५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या ६ हजार ४७ सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisment -