कुठल्याही परिस्थितीत हा घाबरून जाण्याचा विषय नाही, पण…. – राजेश टोपे

Corona is not a matter of fear, said Health Minister Rajesh Tope
Corona is not a matter of fear, said Health Minister Rajesh Tope

अडीच वर्षांपासून महाराष्ट्रसहर जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यात अनेक देशांना यश आले आहे. या पार्श्वभूमीवर इतर देश आणि राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही काही दिवसांपूर्वी कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून पुन्हा एकदा करोनाबाधितांची संश्या धिम्या गतीने वाढूलागली आहे. त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलासादायक विधान केले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

यासंदर्भात आज टोपेंनी दिलासादायक स्पष्टीकरण दिले आहे. मास्कबाबतचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. एक नक्की आहे की १००-१२५ संख्येने आज रुग्णसंख्या वाढते आहे. पण ते फारसे भीतीदायक किंवा गंभीर नाही आहे. कुठल्याही परिस्थितीत हा घाबरून जाण्याचा विषय नाही. आपल्याकडे तेवढी परिस्थिती देखील गंभीर नाही. आपल्याला सगळे बंद करून चालणार नाही, पण थोडी सतर्कता सगळ्यांनी ठेवली पाहिजे, असे देखील राजेश टोपे म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी ओरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली होती. यासंदर्भात आज टोपेंनी दिलासादायक स्पष्टीकरण दिले आहे. मी गुजरातला होतो. ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढते आहे, तिथल्या आरोग्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली. त्यांचे म्हणणे आहे की रुग्ण वाढत आहेत हे खरे आहे. पण अतिशय सौम्य स्वरुपाचा परिणाम रुग्णांवर आहे. रुग्णालयात दाखल होण्याचे मोठे प्रमाण दिसत नाही. गृह विलगीकरणातच रुग्ण बरे होत आहेत, असं टोपे म्हणाले होते.