घरमहाराष्ट्रशिंदे सरकारने निधी रोखल्यानं विकासकामं थांबली, बाळासाहेब थोरातांची टीका

शिंदे सरकारने निधी रोखल्यानं विकासकामं थांबली, बाळासाहेब थोरातांची टीका

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आम्ही घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. यावेळी आम्ही बैठकीसंदर्भात चर्चा केली, असं माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. दरम्यान, शिंदे सरकारने निधी रोखल्यानं विकासकामं थांबली, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

निधी रोखल्यानं विकासकामं थांबली

- Advertisement -

निधी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण बजेटसाठी जे निधी देण्यात आले होते. ते थांबवण्यात आले आहेत. फंड्स आणि इतर गोष्टी थांबल्यामुळे संपूर्ण राज्यातील कामं ठप्प आहेत. विशेषत: पावसामुळे रस्त्यांची काम ठप्प झाली आहेत. त्यामुळे ही कामं सुरु करण्याची विनंती आम्ही त्यांना केली आहेत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

निधीत विरोधी पक्षांच्या आमदारांचा निधी थांबवण्यात आला आहे. हे त्यातला एक भाग आहे. त्यामुळे निधीत भेदभाव करू नये, अशी विनंती त्यांना केली. तसेच सर्व आमदारांना सहकार्य करावं, असं देखील सांगितलं. पहिल्यांदा मंत्री मिळाले नाहीत, त्यामुळे खाते मिळाले नाहीत. खाते न मिळाल्यामुळे पालकमंत्री मिळाले नाहीत. या सर्व गोष्टींमध्ये तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. यासाठी प्रत्येक तास आणि दिवस महत्त्वाचा असतो, असं थोरात म्हणाले.

- Advertisement -

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये राड्याचे वर्चस्व ?

महाराष्ट्राची राजकीय स्थिती आणि संस्कृती पाहिली असता मी ३८ वर्ष आमदार आहे. १८ वर्ष मंत्री राहिलो आहे. एक वेगळीच संस्कृती आपली आहे, राड्याचं कल्चर आपलं नाही. दुर्दैवाने जे काही दिसतंय ते काही ठिक नाही. अधिकाऱ्यांना दमदाटी करणे किंवा पिस्तुल काढणे ही महाराष्ट्राची सुसंस्कृती नाही. ज्यांचे जे नेते आहेत. त्यांनी त्यांना मार्गदर्शन करणं महत्त्वाचं आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.


हेही वाचा : मुकेश अंबानींच्या व्हायरल फोटोमध्ये दिसणारे बाबा कोण? बाबा आणि मुलाचं आहे खास नातं


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -