घरमहाराष्ट्रमी फाईलवर सही केली, आता मुख्यमंत्री निर्णय घेतील अजित पवारांचे स्पष्टीकरण

मी फाईलवर सही केली, आता मुख्यमंत्री निर्णय घेतील अजित पवारांचे स्पष्टीकरण

Subscribe

मोफत लसीकरणाचा आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, लॉकडाऊनवर होणार चर्चा

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करायचे की उत्पन्न गटानुसार नाममात्र दरात करायचे याबाबतचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती देत पवारांनी मोफत लसीकरणाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे.

वित्त विभागाने यासंदर्भात प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर माझी सही होऊन पुढील कार्यवाहीसाठी तो मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येऊन त्यावर चर्चा होईल. या चर्चेअंती जो निर्णय होईल त्याची घोषणा मुख्यमंत्री करतील, असेही पवार यांनी सांगितले. ‘ज्या निर्णयाचा आर्थिक भार राज्यावर पडणार असेल, असे विषय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करणे योग्य असते. इतरांनी त्यावर बोलू नये’, अशी समज सुद्धा या निमित्ताने पवार यांनी स्वपक्षाच्या मंत्र्यांना दिली.

- Advertisement -

बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊनवर चर्चा होईल. ३० मे रोजी सध्याचा लॉकडाऊन संपत आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात रुग्णसंख्या वाढते आहे, असे सांगत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -