Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Vaccination : मुंबईला कोविशील्डचा नवीन साठा उपलब्ध; लसीकरण केंद्र, वेळेबाबत BMC...

Corona Vaccination : मुंबईला कोविशील्डचा नवीन साठा उपलब्ध; लसीकरण केंद्र, वेळेबाबत BMC ने दिली माहिती

केंद्र सरकारकडून रुग्णालयांमध्ये कोविशील्डचा साठा उपलब्ध झाला

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारकडून मुंबईकरांसाठी लसीचा साठा उपलब्ध न झाल्यामुळे आज बहुतेक कोरोना लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. तसेच उद्याही राज्यातील ४० लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत. परंतु केंद्र सरकारकडून मुंबईकरांसाठी लसीच्या साठ्याचा पुरवठा प्राप्त झाला असल्यामुळे उद्या १२ दुपारी १२ नंतर सर्व शासकीय व महानगरपालिकेचे लसीकरण केंद्र सुरु होतील. लसीकरणासाठी शासकीय व महानगरपालिकेच्या कोविड लसीकरण केंद्र, रुग्णालयांमध्ये कोविशील्डचा साठा उपलब्ध झाला असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी लोकांचा प्रतिसाद आहे. परंतु कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील अनेक कोरोना लसीकरण केंद्र बंद करण्यात आली होती. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप झाला होता. २५ एप्रिलपर्यंत एकूण २४ लाख ५८ हजार ६०० इतक्या लसी उपलब्ध झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी २४ लाख १० हजार ८६० लस उपयोगात आल्या. म्हणजेच ४७ हजार ७४० इतका लससाठा २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेपर्यंत लसीकरणानंतर संबधित केंद्रांवर शिल्लक होता. लसी संपल्यामुळे पालिकेने लसीकरण केंद्र बंद केले होते.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून गुरुवारी सकाळपूर्वी केंद्र सरकारकडून आवश्यक लसीचा साठा उपलब्ध झाला, तरच गुरुवारी संपूर्ण दिवसभर शासकीय व महापालिका लसीकरण केंद्र सुरु राहतील, असेही प्रशासनाने म्हटले होते परंतु आता लसीचा साठा उपलब्ध झाला असल्यामुळे उद्या गुरुवारी दुपारी १२ पासून लसीकरण करण्यात येणार आहे. उद्या खासगी लसीकरण केंद्र तसेच रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार नसल्याचे पालिकेने म्हटले आहे.

- Advertisement -