Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Corona Vaccination : राज्यात १८ वर्षांवरील नागिरकांच्या कोरोना लसीकरणाला परवानगी, राजेश टोपेंची...

Corona Vaccination : राज्यात १८ वर्षांवरील नागिरकांच्या कोरोना लसीकरणाला परवानगी, राजेश टोपेंची घोषणा

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा

Related Story

- Advertisement -

देशात २१ जूनपासून सर्वांना मोफत लसीकरणाची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तर राज्यात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत होती. कोरोना लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणाला स्थगिती दिली होती. परंतु आता मंगळवारपासून राज्य सरकारने १८ ते पुढील वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्या येणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसेच राज्यातील नागरिकांनी आपापल्या जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोना लसीचा डोस घ्यावा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यात आतापर्यंत ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत होते. परंतु लसीकरणाला वेग द्यायचा आहे. त्यामुळे १८ वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीकरणाला परवानगी देण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्रातील तरुणाईनं कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोना लस घ्यावी असे आवाहन राजेश टोपे यांनी केलं असून १८ वर्षांच्या पुढील युवक युवती पासून पुढील सर्व वयोगटातील लोकांना कोरोना लस घेण्याचे शक्य असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारकडून मोफत लसीकरण

- Advertisement -

केंद्र सरकारने २१ जूनपासून देशातील १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली आहे. जागतिक योगदिनानिमित्त कोरोना लसीकरण मोहिम जाहीर करण्यात आली आहे. लस उप्तादिन करणाऱ्या कंपन्यांकडून केंद्र सरकार ७५ टक्के कोरोना लसींचा साठा विकत घेणार असून राज्यांना पुरवणार आहे. सुरुवातील केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. परंतु यानंतर १८ ते ४४ वयोगटाची कोरोना लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा करताना म्हटलं आहे.

राज्य सरकार लसीकरणास सज्ज

राज्यातील नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यास राज्य सरकार सज्ज आहे. राज्य सरकार कोरोना लसीकरणासाठी सज्ज असली तरी केंद्र सरकारकडून नियमित लसीचा पुरवठा करण्यात येईल का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अपुऱ्या लसींच्या पुरवठ्यामुळे आणि अधिक वयोगटातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता ४५ वर्षांवरील आणि ३४ ते ४४ वयोगटातील नगारिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबईतील २२७ नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये कोरोना लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आले आहेत. तसेच आरोग्य शिबीररांसारखे कोरोना लसीकरण करणार असल्याची माहिती मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -