घरताज्या घडामोडीCorona Virus : मंत्री अशोक चव्हाणांना पुन्हा कोरोनाची लागण, मंत्रिमंडळ बैठकीला होते...

Corona Virus : मंत्री अशोक चव्हाणांना पुन्हा कोरोनाची लागण, मंत्रिमंडळ बैठकीला होते उपस्थित

Subscribe

महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि आणखी काही मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी गुरुवारी समाज माध्यमांवर दिली असून करोनाचा अहवाल प्राप्त होताच त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडून जाण्याचा निर्णय घेतला. अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील उपस्थितीने मात्र इतर मंत्र्यांची चिंता वाढवली आहे. राज्य मंत्रिंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री व्हिसीद्वारे उपस्थित राहिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ उतार सुरुच आहे. लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना या अगोदरही करोनाची लागण झाली होती. पहिल्या लाटेत करोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना नांदेडहून मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मंत्रिमंडळ बैठक सुरु असतानाच त्यांना आपण पॉझिटिव्ह आल्याचे कळले. त्यानंतर तातडीने त्यांनी बैठक अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

गुरुवारी दुपारी अशोक चव्हाण यांनी बीकेसी येथील काँग्रेस प्र्भारी यांच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्या बैठकीला बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, नाना पटाले आणि प्रभारी एच. के. पाटील उपस्थित होते. दरम्यान कोरोनाची लागण झाल्याची माहिती अशोत चव्हाण यांनी स्वतः ट्विट करुन दिली होती. “माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कृपया, संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी तसेच टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आतापर्यंत १४ मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

राज्याच्या हिवाळी अधिवेशनानंतर अनेक मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. यानंतर बऱ्याच मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि आणखी काही मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : महाविकास आघाडी म्हणजे गांधीजींची तीन बंदरे, गिरीश महाजनांची खोचक टीका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -